आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 169 Gram Panchayats In Nashik District 'Hagandari Free More' Movement Of 'these' Villages Towards Idealism, Implementation Of Swachh Bharat Mission

नाशिक जिल्ह्यातील 169 ग्रामपंचायती 'हागणदारीमुक्त अधिक':'या' गावांची आदर्शतेकडे वाटचाल, स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेल्या व हागणदारीमुक्त अधिक गावाबाबतचे निकष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील 169 ग्रामपंचायतींना हागणदारीमुक्त अधिकचा (ओडीएफ प्लस) दर्जा मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या गावांचे अभिनंदन केले असून या गावांनी आदर्श गावाकडे वाटचाल करण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या पहिल्या टप्प्यात गाव हागणदारी मुक्त करण्यावर भर देण्यात आला होता. यात प्रामुख्याने वैयक्तिक शौचालय बांधकामे मोठया प्रमाणात करण्यात आली. 2019 मध्ये देश हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला होता.

वैयक्तिक-सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेची कामे

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये, वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत. प्रत्येक गावामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करणे यासारखी कामे करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावर सदर गावाला हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) मानांकनाचा दर्जा प्रदान करण्यासाठी विविध निकषांची पूर्तता करून टप्प्या टप्प्याने गावे हागणदारीमुक्त अधिक घोषित करणार आहेत.

कचरा वर्गीकरण

हागणदारीमुक्त अधिक गावांचे तीन प्रकार असून उदयमान (ASPIRING), उज्जल (RISING) व उत्कृष्ट (MODEL) या प्रकारात गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून जाहिर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हागणदारीमुक्त अधिक घोषित केलेल्या 169 गावांपैकी 161 गावांनी उत्कृष्ट (MODEL) गावाचा दर्जा प्राप्त केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. या गावांमध्ये घरगुती स्तरावरुनच कचरा वर्गीकरण करणेबाबत काम करण्यात येणार असून 40 गावांची कार्यशाळाही जिल्हास्तरावर घेण्यात आली आहे.

हागणदारीमुक्त गावे

तालुकानिहाय हागणदारीमुक्त अधिक घोषित गाव पुढीलप्रमाणे- बागलाण-23, चांदवड-6, देवळा-1, दिंडोरी-5, इगतपूरी-7, कळवण-12, मालेगाव-3, नांदगाव-8, नाशिक-14, निफाड-12, पेठ-20, सिन्नर-4, सुरगाणा-28, त्रंबकेश्वर-12, येवला-4

बातम्या आणखी आहेत...