आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्डचे वितरण:1733 दिव्यांग प्रवाशांना मोफत कार्डचे सिटीलिंककडून वितरण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने पालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ति तसेच शहराबाहेरील परंतु शिक्षणासाठी महालिका हद्दीत राहत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर पासून मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे. या याेजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत २३६६ दिव्यांगाची नाेंदणी करण्यात आली असून सिटीलिंकच्या वतीने त्यांना कार्डचे वितरण करण्यात आले.

शहरी प्रवासी भागात सिटीलिंकच्या वतीने प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यास प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे. सिटीलिंकच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना मदत व्हावी यासाठी अभिनव याेजना सुरु करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना माेफत प्रवास करता यावा यासाठी मोफत कार्ड काढून देण्याची सुविधा देखील सिटीलिंकने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार दिनांक १३ ऑक्टोबर ते ३ डिसेंबरपर्यत २३६६ मोफत कार्ड दिव्यांग प्रवाश्यांना काढून देण्यात आले आहेत. यामध्ये २०९४ दिव्यांग तर२७२ अंध प्रवाशांचा समावेश आहे.

दिव्यांग प्रवाशांना मोफत कार्ड उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू असून ज्या दिव्यांग प्रवाश्यांना मोफत कार्ड काढावयाचे आहे, त्यांनी कागदपत्रांसह सिटीलिंक मुख्यालयातील पास केंद्र याठिकाणी भेट देऊन मोफत कार्ड काढून घ्यावे. ज्या दिव्यांग प्रवाश्यांना मोफत प्रवासाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी मोफत कार्ड काढून घ्यावे असे आवाहन सिटीलिंक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, पालिका हद्दीत राहत असल्याचा पुरावा, फोटो, दिव्यांग असल्याचे शासकीय प्रमाणपत्र, शहराबाहेरील परंतु शिकण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीत राहत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट, कार्ड काढण्यासाठी ४० रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल.

बातम्या आणखी आहेत...