आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि फेन्सिंग फेडेरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अखिल भारतीय मराठा महासंघ क्रीडा विभागाच्या सहकार्याने नाशिकच्या स्व. मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेलेल्या कॅडेट गटाच्या १९ वर्षे मुलांच्या आणि मुलींच्या १७ व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेची मोठ्या उत्साहात सांगता झाली.
या स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूनी उत्कृष्ट खेळचे प्रदर्शन करून मुलांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर मुलींमध्ये महाराष्ट्राच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये माणिपूरच्या खेळाडूनी चांगला खेळ करून ३८ गुणांसह विजेतेपद मिळविले.
मुलांच्या सॅबर प्रकारात महाराष्ट्राच्या निखिल वाघने पहिल्या सांमन्यापासूनच आक्रमक खेळ करून या प्रकारात सुवर्णपदक पटकावले, तर श्रेयश जाधवने कास्य पदक मिळविले. या दोन खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे महाराष्ट्राला मुलांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळविता आले. तर मुलींमध्ये फॉईल प्रकारात महाराष्ट्राच्या वैदेही लोहियाने अंतिम लढतीत माणिपूरच्या सोनीया देवी वैकहोमला चांगली लढत दिली परंतु शेवटच्या दोन मिनिटात सोनीया देवीने तीन गुण वसूल करून हा अंतिम सामना जिंकून विजेतेपद मिळविले. त्यामुळे वैदेहीला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
मुलींच्या ईपी या प्रकारात महाराष्ट्राच्या जान्हवी जाधवलाही अंतिम लढतीत माणिपूरच्या देवी सईकहोम नेलकीरोजने पराभूत केल्यामुळे तिलाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर याच प्रकारात महाराष्ट्राच्या अनुजा लाडने उपांत्य फेरी गाठून चांगली कामगिरी करत कास्य पदक मिळविले.
मुलींच्या सॅबर प्रकारात उपांत्य फेरीत मजल मारणाऱ्या शर्वरी गोसावडेचा उपांत्य फेरीमध्ये पराभव झाल्यामुळे तिलाही कास्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या मुलींच्या या कामगिरीमुळे त्यांना सर्वसाधारण उप विजेतेपद मिळाले. मणीपुरच्या सोनीया देवी वैकहोम, देवी सईकहोम नेलकीरोज आणि लाईश्राम याबी देवी या तीनही खेळाडूनी अनुक्रमे ईपी, फॉईल आणि सॅबर या तीनही प्रकारात वर्चस्व राखून सुवर्णपदक मिळविले. त्यांच्या या सुवर्ण कामगिरीमुळे माणिपूरला महिलामध्ये सर्व साधारण विजेतपद मिळाले.
या स्पर्धेत विजयी संघांना प्रमुख पाहुणे आमदार आडव्होकेट राहुल ढिकले, मराठा महासंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष शिवछत्रपती प्राप्त शेषनारायण लोढे विलास वाघ माजी पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बनकर प्राचार्य हेमंत देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा निकाल :-
मुले - १) महाराष्ट्र सर्वसाधारण विजेतेपद. (१८ गुण) २) हरियाणा - सर्वसाधारण विजेतेपद (१६ गुण) ३)मणिपूर - तिसरा क्रमांक (१५ गुण)
मुली - १) मणिपूर - सर्वसाधारण विजेतेपद. (३८ गुण) २) महाराष्ट्र - सर्वसाधारण विजेतेपद (१६ गुण), ३)हरियाणा - तिसरा क्रमांक (१४ गुण).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.