आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव ते दिवाळीपर्यंत एक हजार किलो प्लास्टिक जप्त:आठ महिन्यात 18 लाख 55 हजाराचा दंड; नाशिक मनपाची कारवाई

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टिकसारख्या अविघटनशील कचऱ्यामुळे मानवी तसेच निसर्गावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेत नाशिक शहर टास्क फोर्सने महापालिका क्षेत्रात पुर्णत: प्लास्टिक बंदी केल्यानंतरही त्याचा सर्रास वापर होत असल्याचे पुढे आले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दहा महिन्यांमध्ये 2024 किलो प्लास्टिक जप्त करून 18 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यातील 1000 किलो प्लास्टिक सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये अर्थातच गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीमधील आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट 2021 मध्ये सुधारीत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2021 संमत केला. त्यानुसार टप्प्याटप्याने संपूर्ण देशभरात प्लास्टिक बंदी लागू केली जात आहे. पहिल्या टप्प्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह वस्तूंवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर 30 सप्टेंबर 2021पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांसह, इतर प्लास्टिक वस्तूंवर बंदी लागू करण्यात आली आहे.

नाशिकमध्येही त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.परंतु,प्लास्टिक बंदी साठी महापालिकेने तयार केलेल्या टास्क फोर्सने आता शहरात पुर्णपणे प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली शहरस्तरीय टास्क फोर्स समितीची पहिली बैठक झाल्यानंतर शहरातील प्लास्टिक वापर, विक्री, साठवणूकीचा आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अधिसूचना 2018 ची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्लास्टिकच्या प्रतिबंधीत वस्तू, कम्पोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, बाउल, डबे यावर आता शहरात पुर्णपणे बंदी राहणार आहे. प्रतिबंधीत प्लास्टिक मग ते कोणत्याही जाडी अथवा लांबीचे असो त्याचा वापर, विक्री, साठवणूक इ.स नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात पुर्णपणे प्रतिबंध करून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या दहा महिन्यांमध्ये 18 लाख 55 हजार दंड वसूल केल्याची माहिती घनकचरा विभागाचे संचालक डॉ . आवेश पलोड यांनी दिली आहे.

या आस्थापनांमध्ये प्लास्टिक बंदी

नागरीक, संस्था, कार्यालये, दुकाने, हॉटेल्स, खानावळ, दुध विक्रेते, भाजी विक्रेते व अन्य सर्व प्रकारच्या कुठल्याही आस्थापनामध्ये कोणत्याही प्लास्टिकचा वापर किंवा साठवणूक होता कामा नये.या बाबींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे संबंधितांविरूध्द कारवाई करणेत येईल.

बातम्या आणखी आहेत...