आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:रांगोळी स्पर्धेत 180 महिलांचा सहभाग, अदिती, वैश्ववी पटेल, माया टोणपे विजेत्या; 31 बक्षिसे देऊन महिलांचा सत्कार

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दीपावलीच्या रांगोळी स्पर्धेत १८० महिलांनी सहभाग नोंदवल्याने चुरशीच्या झालेल्या कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ पार पडला. वेगवेगळ्या गटात अदिती पटेल, वैश्ववी पटेल, माया टोणपे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. बुधवारी मर्चंट बँकेच्या सभागृहात स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी फाउंडेशनकडून ३१ बक्षिसे देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.

कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत महिला,युवतींनी सहभाग नोंदवला. विविध रंगांच्या रांगोळ्यांतून उत्कृष्ट कलाविष्कार साधत महिलांनी एकाग्रतेने पाच-सात तास घालवून मग्न होत हे रेखाटन साकारले होते. टिपक्यांची रांगोळी, संस्कार भारती आणि विषयाचे बंधन नसलेल्या अशा रांगोळ्या काढल्या.

शिवाजी महाराज, अयोध्येत साकारत असलेले श्रीराम मंदिर, देखण्या पैठणी, कोरोना वाॅरियर्स, सिंधूताई सपकाळ, स्वच्छ भारत अशा अनेक रांगोळ्यांनी लक्ष वेधले. याशिवाय मातृप्रेम, पाने-फुले, धार्मिक प्रसंग, पशु-पक्षी, व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, बेटी बचाव, थ्रीडी अशा विविध विषयांवरील रेखाटलेल्या रांगोळ्या नजरेत भरणाऱ्या होत्या. परीक्षक संगीता पटेल, ज्योती खंदारे, अंकिता मानेकर, तृप्ती परदेशी, श्रीकांत खंदारे, राकेश तडवी आदींच्या हस्ते या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विजेत्या भगिनींना तीन गटात प्रथम ३००१, द्वितीय २००१, तृतीय १००१, चतुर्थ ७०१ तसेच उत्तेजनार्थ ५०१ असे तब्बल ३१ बक्षिसे यावेळी देऊन गौरविण्यात आले.

या महिला झाल्या विजेत्या : हस्तकला गट : प्रथम - अदिती पटेल, द्वितीय - अमृता गुजराथी, तृतीय - दर्शना परदेशी, चतुर्थ - सृष्टी पटेल,
उत्तेजनार्थ : भूमी कासार, सेजल असार,ज्योती कुक्कर, पल्लवी वाणी, प्रणाली शिंदे, ऋतुजा विखे,अनामिका कायस्थ, दीपाश्री पावटेकर, श्रद्धा काबरा, ज्योती कोदे, जय भवानी मित्रमंडळ. ठिपक्यांची रांगोळी गट : प्रथम - वैष्णवी पटेल, द्वितीय - सिद्धी कासार, तृतीय - तनया कंदलकर, चतुर्थ - तेजस्वीनी कुक्कर. संस्कार भारती : प्रथम - माया टोणपे, द्वितीय - स्नेहल मगर, तृतीय - कोमल राजपूत, चतुर्थ - श्रद्धा राजपूत. उत्तेजनार्थ : विद्या लुटे, दर्शना जैन, बाल गट : भक्ती करंजकर, रेणुका कुंभकर्ण, रोशनी परदेशी, वैभवी माळवे, श्रेया परदेशी.

बातम्या आणखी आहेत...