आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 नाशिककर एकाचवेळी झाले आर्यनमॅन:कझाकिस्तानमध्ये फडकवला तिरंगा, जागतिक स्तरावर भारताचा नवा विक्रम

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सव उत्साहात साजरा हाेत असताना 19 नाशिककरांनी कझाकिस्तानमध्ये अत्यंत खडतर अशी आर्यनमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत तिरंगा फडकविला.विशेष म्हणजे जागतिक स्तरावर एकाचवेळी एकाच शहरातील तब्बल 19 आयर्नमॅन घडल्याने जागतिक स्तरावर नवा विक्रम नाेंदवण्यात आला. विशेष म्हणजे प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले यांनी सलग तीन वेळेस आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत हॅट्रिक केली.

3.8 किमी स्विमिंग, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे असे खडतर आव्हान साडेसाेळा तासात पूर्ण करणे अपेक्षित असते. कझाकिस्तान मध्ये रंगलेल्या या स्पर्धत यंदा 22 नाशिककर सहभागी झाले हाेते. भारतीय हवामान व कझाकिस्तानमधील वातावरण यात खूप फरक असल्याचे सुरुवातीपासून स्पर्धा वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान निर्माण झाले हाेते. त्यात भाषा व आहारामुळे देखील अनेक अडचणीचा सामना करावा लागत हाेता. मात्र निर्धारित वेळेतच ही स्पर्धा पूर्ण करण्याच्या उद्देशाने नाशिक येथील स्पर्धक सहभागी झाले हाेते.

या स्पर्धेची सुरुवात स्विमिंगने झाली. खुल्या जलप्रवाहात 2 हजाराहून अधिक स्पर्धेक एकाचवेळी स्विमिंंग प्रकारात सहभागी झाले हाेते. खुला जलप्रवाह असल्याने दिशेबाबतची अनिश्चिता. वेगाने येणाऱ्या लाटा अन स्पर्धकांची गर्दी यामुळे हा प्रकार पूर्ण करण्याचे माेठे आव्हान हाेते. त्यानंतर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करत 180 किमी सायकलिंग स्पर्धा व त्यानंतर 42 किमी धावणे असे विविध टास्क पूर्ण करत नाशिककर 19 स्पर्धकांनी साडेसाेळा तासात पूर्ण करत आर्यनमॅनचा किताब पटकाविला. या अनाेख्या विक्रमामुळे जागतिक स्तरावर उंचावले गेेले असून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खाेवला गेला आहे

नाशिककर झाले आयर्नमॅन

डाॅ वैभव पाटील, डाॅ पकंज भदाणे, डाॅ दुष्यंत चाेरडीया, डाॅ. देविका पाटील, डाॅ. अरुण गचाळे, किशाेर काळे, माणिक निकम, अनिकेत झवर, प्रशांत डाबरी, अश्विनी देवरे, नीलेश झवर, नीता नारंग, अविष्कार गचाळे, निसर्ग भामरे, अरुण पालवे, महेंद्र छाेरीया, किशाेर घुमरे, विजय काकड, धीरज पवार या नाशिककरांनी कझाकिस्तानमधील स्पर्धा गाजवली.

पिता-पुत्र यशस्वी

या स्पर्धेत डाॅ. अरुण गचाळे व त्यांच्या १७ वर्षीय मुलगा अविष्कार यंानी देखील यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केली. अंत्यत आव्हनात्मक असणारी ही स्पर्धा पुर्ण करणारी ते पिता-पुत्रांचे विशेष काैतूक केले जात आहे.

महिला पाेलिस अधिकाऱ्यांची चर्चा

या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते पाेलिस नाईक अश्विनी देवरे यांनी. ही स्पर्धा 14 तास 24 मिनिटे 46 सेकंदात पूर्ण केली. कझाकिस्तानमध्ये झालेल्या या स्पर्धेत अशी कामगिरी करणाऱ्या देवरे या राज्यातील पहिल्या पाेलिस अधिकारी ठरल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...