आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 दुचाकींना धडक:भरधाव डंपरची 2 कार, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, दुचाकीस्वार वाचले

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्यपी कारचालकाने आठ वाहनांना धडक देण्याची घटना ताजी असताना शहर पुन्हा भरधाव जाणाऱ्या डंपर (मिक्सर)ने दोन कार, दाेन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाले. मात्र वाहनांचे नुकसान झाले. सोमवारी (दि. २१) मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या मागे दुपारी ४.३० वाजता ही घटना घडली. डंपरचालक फरार झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि चंद्रकांत टोपले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्र्यंबकनाक्याकडून मुंबईनाक्याकडे येत असताना शताब्दी हाॅस्पिटलसमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. यामुळे कारचा वेग कमी केला असता पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने कारला धडक दिली. डंपरची धडक इतकी जोरात होती की शेजारी असलेल्या डाॅ. मोरे यांच्या कारला (एमएच १९ डीसी ९१३४) धडक बसून कारच्या मागील बाजूचे नुकसान झाले. डंपरचालकाला विचारणा करण्यास टोपले कारमधून उतरले असता संशयित चालक गर्दीतून फरार झाला. इतर वाहने थांबल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत डंपर रस्त्यावरून हलवला. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक फेल झाल्याची चर्चा संशयित डंपरचे ब्रेक फेल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चालक पळून गेल्यानंतर पोलिसांनी अवजड वाहनचालकाच्या मदतीने डंपर पोलिस ठाण्यात जमा केला.

कारमुळे वाचल्या दुचाकी डंपरने कारला धडक दिल्याने कारचालकाने ब्रेक लावला. यामुळे पुढे असलेल्या चार दुचाकी वाचल्या.दुचाकींना धडक दिली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

बातम्या आणखी आहेत...