आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:नाशकात काँग्रेसचे 2 नेते अपघातामध्ये ठार

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानस दौलत पगार - Divya Marathi
मानस दौलत पगार

भरधाव जाणाऱ्या कारने पुढे जाणाऱ्या वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचा मित्र ठार झाला. बुधवारी रात्री ११.३० वाजता उड्डाण पुलावर संतोष टी पाॅइं‌ट येथे हा भीषण अपघात घडला. मानस दौलत पगार (३१) आणि सूरज नितीन मोरे (२४ दोघे रा. पिंपळगाव बसवंत) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. कारमधील अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मानस पगार हे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...