आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा कुठल्याही दबावाशिवाय:एकाच दिवशी २ परीक्षा; विद्यापीठाकडून दिलासा; लॉ आणि पदवी परीक्षेतील गोंधळ मिटला

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधीची सीईटी आणि पदवीच्या अंतिम वर्षाचा भूगोलाच्या एकाच दिवशी येणाऱ्या पेपरचा प्रश्न पुणे विद्यापीठाने निकाली काढला आहे. लाॅची सीईटी आणि पदवी अंतिम वर्षाचा भूगोलाचा पेपर असलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा १० दिवसांनी आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कुठलीही चिंता नसून ते लाॅ सीईटीची परीक्षा कुठल्याही दबावाशिवाय देऊ शकणार आहे.

विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली सीईटी परीक्षा आणि पदवीच्या भूगोलाचा पेपर एकाच दिवशी आणि एकाच वेळा म्हणजे बुधवारी (दि. ३ आॅगस्ट) सकाळी ९ ते ११ दरम्यान नियोजित होता. त्यामुळे संबंधित विषय असलेल्या आणि विधी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. पण, पुणे विद्यापीठाने पदवीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. भूगोलाचा पेपर १० दिवसांनी घेतला जाईल. त्यामध्ये खेळाडू, इतर स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी आहे. त्याची तारीख आणि वेळ ही स्वतंत्रपणे कळविली जाणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...