आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री भगवती देवी सप्तशृंगी मातेचे स्वरूप (मूर्ती) संवर्धन व देखभाल प्रक्रियेदरम्यान मूर्तीवरील शेंदूर काढल्यानंतर दररोज हाेणाऱ्या पंचामृत अभिषेक पूजेच्या नियमात सामग्री वापरण्यासाठीचे बदल करण्यात आले आहे.
श्री भगवती स्वरूपाच्या निरंतर पूजेसाठी हा बदल जरुरीचा आहे. त्यामुळे पाणी, दूध, लोणी, मध, साखर, नारळपाणी तसेच तुपाचा वापर बंद करण्यात आला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून भाविकांच्या योगदानातून तयार करण्यात आलेल्या श्री भगवतीच्या २५ किलो चांदीच्या उत्सवमूर्तीवरच पंचामृत महापूजा करण्यात येणार आहे. २६ सप्टेंबरपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले हाेणार आहे. २०१४ पासून श्री भगवती स्वरूप (मूर्ती) संवर्धनाबाबत चर्चा सुरू हाेती, विविध ठरावही झाले हाेते. नियोजनाचा विचार करता भारतीय पुरातत्व व आय. आय. टी. पवई यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाप्रमाणे सर्वप्रथम श्री भगवती मंदिराच्या वरील डोंगराचा परिसराचे तांत्रिक निरीक्षण आणि त्याबाबतच्या उपाययोजना करून, श्री भगवती स्वरूपान्या प्रत्यक्ष संवर्धन व देखभाल प्रक्रियेची सुरुवात जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने व काटेकोर नियोजन करून भारतीय पुरातत्व विभागाकडील नोंदणीकृत असलेली नाशिकची मे. अजिंक्यतारा कन्सल्टन्स या संस्थेमार्फत व सेवानिवृत्त अधीक्षक डॉ. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
२० जून ते ८ सप्टेंबर २०२२ दरम्यान मूर्तीचे संवर्धन
२० जून ते ८ सप्टेंबर २०२२ दरम्यान मूर्तीचे संवर्धन करण्यात आले. शेंदूर काढण्यात आल्याने अत्यंत प्राचीन व मूळ तेजोमय स्वरूप श्री भगवतीच्या मूर्तीस प्राप्त झाले आहे. हे तेजोमय स्वरूप जसेच्या तसे जतन करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळ, पुरोहितवर्ग तसेच स्थानिक गावकरी, विश्वस्त संस्थेचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी व भाविकांची असल्याचे विश्वस्त मंडळाने म्हटले आहे.
विशिष्ट दिवशीच हाेणार मूळ मूर्तीवर अभिषेक
विश्वस्त संस्था व पुजारी वर्गाने निर्धारित केलेले महत्त्वाचे सण-उत्सव व मुहूर्त वगळता इतर सर्व दिवशी चांदीच्या उत्सव मूर्तीवरच श्री भगवतीची पंचामृत महापूजा नियोजित असेल, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विश्वस्त संस्थेकडून करण्यात आले आहे.
शेंदूर काढल्याने तेजाेमय स्वरूप आले समाेर
शेंदूर काढल्यानंतर भगवतीचे समाेर आलेले तेजोमय स्वरूपाची प्रतिकृतीच या उत्सवमूर्तीच्या रूपाने नाशिकच्या ए. बी. ज्वेलर्सकडे साकारली जात आहे. २५ ते २७ किलाे शुद्ध चांदीमध्ये २ फूट उंचीची ही मूर्ती पाच कारागिरांकडून साकारली जात आहे. विशेष म्हणजे, हे काम मिळणे भाग्य असल्याचे हे काम नि:शुल्क केले जात असल्याचे ए. बी. ज्वेलर्सचे संचालक कन्हैया आडगावकर यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.