आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 2 Girls Missing From Girls Hostel In Nashik Said She Was Going Home And Never Returned, A Case Of Kidnapping Was Registered In Gangapur Police

नाशिक येथील गर्ल्स हॉस्टेलमधून 2 मुली बेपत्ता:घरी जाते सांगून गेली ती पुन्हा परतलीच नाही, गंगापूर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्ल्स होस्टेल मधील अल्पवयीन मुलगी घरी जाते असे सांगून गेली ती घरी पोहचलीच नाही. गंगापूर रोडवरील एका हॉस्टेलमध्ये गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि हॉस्टेलच्या व्यावस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार, गर्ल्स हॉस्टेल मध्ये गरीब, बेवारस मुलींना राहण्याची सुविधा दिली जाते. हॉस्टेल मधील सोळा वर्षीय मुलीने हॉस्टेलच्या व्यवस्थापनाला दोन दिवस घरी जाते असे सांगितले. मात्र 2 दिवस दोन दिवस झाले तरी मुलगी परतली नाही. त्यामुळे व्यवस्थापनाने तिच्या घरी संपर्क साधला असता माहिती ती घरी परतलीच नसल्याचे समजले.

2 मुली बेपत्ता

मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच कुटुंबियांना हादरा बसला. त्यांनी तत्काळ हॉस्टेलमध्ये धाव घेतली. हॉस्टेल व्यवस्थापन आणि मुलीच्या कुटुंबियांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मुलीचे वर्णन आणि फोटोच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र अद्याप तिच्याशी कुठलाही संपर्क झालेला नाही. काही दिवसांपुर्वी याच हॉस्टेल मधून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तीचा अद्याप शोध लागला नसल्याने दुसरी मुलगी बेपत्ता झाल्याने या मुलींचा शोध घेण्याचे यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

ह्युमन ट्राफिकिंग सेल कडून शोध

वरिष्ठ निरिक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे. गुन्हे शाखेच्या ह्युमन ट्राफिकिंग सेलकडून मिसिंग महिला व मुलींचा शोध घेतला जात आहे. अल्पवयीन मुलींकडे मोबाईल नसल्याने त्यांना शोधणे यंत्रणेला अवघड जात आहे. मात्र या प्रकरणात एकाच हॉस्टेलमधील 2 मुली बेपत्ता झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...