आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचे सोने घेणाऱ्या सराफाला बेड्या:सोनसाखळी ओरबडणाऱ्या चोरांकडून 2 लाख 17 हजाराजा मुद्देमाल जप्त

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबडणाऱ्या चंद्रकांत केदारे या चोरट्यासह त्याच्याकडून चोरीचे सोनं विकत घेणाऱ्या कृष्णा दिलीप टाक (33) या सराफाला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही 5 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एकट्या सातपूर परिसरात तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं चोरट्याने ओरबडल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून अजूनही सात ते आठ गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गुन्हा दाखल

सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत कौतिक केदारे (28) याने भर दिवसा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याचा धडाका लावला होता. श्रमिकनगर परिसरात लागोपाठ दोन दिवस महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. 30 ऑगस्ट रोजी राधाकृष्णनगर चौकातून मुलांना शाळेत सोडण्यासाठी पायी जाणाऱ्या प्राची पुरुषोत्तम बाबर या महिलेच्या गळ्यातील 33 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने ओरबाडली होती.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांनी तीन वेगवेगळी पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्हीचे बारकाईने निरीक्षण केले. सोनसाखळी चोराने परिधान केलेले कपडे व त्याच्याकडे लाल काळ्या रंगाचे हेल्मेट, तसेच होंडा शाईन मोटरसायकल व टाकीला लाल पट्टे असल्याचे निष्पन्न झाले होते. डी. बी. पथकाच्या तिन्ही टीम श्रमिकनगर, कार्बन नाका व राधाकृष्णनगर भागात संशयीताचा शोध घेण्यासाठी कार्यरत होत्या. याचवेळी श्रमिक नगर मधील हिंदी शाळेच्या परिसरात वरील वर्णनाचा संशयित डी.बी. पथकातील कर्मचारी विनायक आव्हाड व सागर गुंजाळ यांना दिसला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताच तो जोरात पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली देतानाच श्रमिकनगर मधील निर्मित लाईफ फेज येथे राहणाऱ्या कृष्णा दिलीप टाक या सराफाला सोनं विक्री केल्याची कबुली दिली. सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख यांनी शनिवारी (दि.3) पत्रकार परिषद घेऊन सातपूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...