आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने चोरी करणारी टोळी जेरबंद:प्रवाशी म्हणून बसणाऱ्या महिला प्रवाशांचे 2 लाखांचे दागिने हस्तगत; 2 महिलांसह रिक्षा चालकाला अटक

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रिक्षा प्रवासात महिला प्रवासांचे दागिने चोरी करणारी टोळी नाशिक मुंबईनाका पोलिसांनी जेरबंद केली आहे.पोलिस पथकाने शनिवार 11 जून रोजी कारवाई केली होती. या टोळीत रिक्षा चालकासह 2 महिलांना पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. यामध्ये 2 लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. अनिल कमरसिंग देंगे (रा.देवळाली कॅम्प), शितल गोकुळ कसबे (रा धुळे), अनिता विजय ससाणे (रा. जळगाव) असे या टोळीच्या सदस्यांचे नावे आहेत.

अशी आहे घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नानी दमण येथील राहणाऱ्या मंगल क्षिरसागर (वय 65) या वापी गुजरात येथून त्यांची बहिणीला भेटण्यासाठी 25 मे रोजी महामंडळाच्या बसने नाशिक येथे आल्या होत्या. द्वारका चौकात उतरुन त्यांनी पाथर्डी फाटा येथे जाण्यासाठी सिटरच्या रिक्षेत बसल्या. काही वेळाने आणखीन तीन महिला रिक्षामध्ये बसल्या. गर्दीकरत महिला दाटीवाटी करत बसत असतांना शेजारी बसलेल्या महिलेने बॅगची चैन उघडून 2 लाख 13 हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. संशयित रिक्षा चालकाने क्षिरसागर यांना पाथर्डी फाटा येथे न सोडता राणे नगर येथे उतरवून दिले. बॅग उघडून पाहिली असता त्यात सोन्याचे दागिने नसल्याचे निदर्शनास आले. या झालेल्या प्रकारानंतर मंगल क्षिरसागर यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

आरोपींना घेतले ताब्यात

दरम्यान पोलिस पथकाने तपास सुरू केला असताना त्यांना रिक्षा चालकाची माहिती मिळाली. यावेळी रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन संशयित महिलांचे नावे सांगितले. पथकाने दोन्ही महिलांना शालिमार परिसरातून अटक केली. वरिष्ठ निरिक्षक सुनिल रोहोकले, के.टी.रौंदळ, आर.व्ही. सोनार, आप्पा पानवळ, अनिल आव्हाड, समीर शेख यांच्या पथकाने उपआयुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

महिला प्रवाशी होत्या लक्ष

संशियत टोळी महिला प्रवाशांना आपल्या जाळ्यात अडकून रिक्षामध्ये प्रवास करताना त्यांच्याशी बोलण्याच्या नादात बॅगमध्ये असलेले मौल्यवान दागिने चोरी करत असल्याचे या प्रकरणात उघडकीस आले आहे.

बातम्या आणखी आहेत...