आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:लाचप्रकरणी भूमीअभिलेखच्या‎ 2 अधिकाऱ्यांसह एकावर गुन्हा‎

नाशिक‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फायनल लेअाउटमध्ये त्रुटी दाखवून‎ शेजारील गटातील क्षेत्र गटात सरकून‎ न देण्याच्या मोबदल्यात १० लाखांची‎ मागणी करणाऱ्या त्र्यंबकेश्वर‎ भुमिअभेलख कार्यालयाचा‎ शिरस्तेदार दौलत समशेर,‎ भू-करमापक भास्कर राऊत अाणि‎ खासगी मोजणी व बांधकाम‎ व्यावसायिक वैजनाथ पिंपळे या‎ तिघांच्या विरोधात लाचेची मागणी‎ करत स्विकारण्याची तयारी‎ दाखवल्या प्रकरणी लाचलुचपत‎ प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल‎ केला.‎

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक‎ विभागाने दिलेली माहिती अाणि‎ तक्रारीनुसार, तक्रारदार यांचे‎ त्र्यंबकेश्वर येथे फायनल ले अाऊट‎ अाहेत. या लेअाउटची मोजणी‎ करण्यासाठी त्र्यंबकेश्वर‎ भूमीअभिलेख कार्यालयात अर्ज‎ केला होता. तक्रारदार यांना शिरस्तेदार‎ दौलत समशेर अाणि भू-करमापक‎ भास्कर राऊत यांनी खासगी मोजणी करणारा‎ वैजनाथ पिंपळे यास‎ मोजणीसाठी सांगीतले होते.‎

दोघांनी फायनल ले अाऊटमध्ये‎ त्रुटी दाखवण्याचा अाणि‎ तक्रारदार यांचा गट शेजारील‎ गटात सरकू न देण्याच्या‎ मोबदल्यात खासगी इसम पिंपळे‎ याच्या मध्यस्थीने १० लाखांच्या‎ लाचेची मागणी केली. तक्रारदार‎ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक‎ विभागात तक्रार केली. पथकाने‎ पडताळणी केली असता तिघांनी‎ लाचेची रक्कम स्विकारण्याचे‎ मान्य केले. निरिक्षक गायत्री‎ जाधव, संदीप घुगे, अनिल‎ बागुल, प्रकाश महाजन, किरण‎ अाहिरराव, अजय गरुड यांच्या‎ पथकाने अधिक्षक शर्मिष्ठा‎ वालावलकर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली ही कारवाई‎ केली.‎

बातम्या आणखी आहेत...