आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:राज्यात 2 ते 3 दिवस अवकाळीचा, तर मराठवाड्यात गारपिटीचा अंदाज; पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यांसोबत आर्द्रतेचेही आगमन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यांसोबत आर्द्रतेचेही आगमन झाल्याने आगामी दोन ते तीन दिवस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकणात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज कुलाबा वेधशाळेच्या सुषमा नायर यांनी व्यक्त केला आहे. राज्यात हवामानात बदल झाला असून ऐन उन्हाळ्यात राज्यातील काही भागांत पावसाचे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी ४ नंतर मालेगाव शहर व परिसरात १० मिनिटे अवकाळी पाऊस झाला.

अकोला : पारा ४०.४ अंशांवर
बुधवारी विदर्भाातील अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्ये पारा चाळिशीपार पोहोचला होता. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक तापमान सर्वाधिक ४०.४ अंश होते. सोलापुरातही स्थानिक केंद्रांवर बुधवारी ४०.३ अंश तापमान नोंदवण्यात आले.

निवडक शहरांतील तापमान
अकोला४०.४
सोलापूर४०.३
ब्रह्मपुरी४०.२
चंद्रपूर४०.२
वर्धा४०.०
परभणी३९.१
अमरावती३८.८
यवतमाळ३८.७
नागपूर३८.६
गोंदिया३८.२
बुलडाणा३८.०
बीड३८.४
धाराशिव३८.४
छत्रपती संभाजीनगर३७.२
पुणे३६.८
नाशिक३५.२