आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती आगीच्या घटनेची दखल:सिव्हिलमध्ये एसएनसीयू विभागाचे 2 व्हेंटिलेटर बंद; त्याच कंपनीची यंत्रणा असल्याने निर्णय

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू विभागात व्हेंटिलेटरला शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याने नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. ज्या कंपनीने राज्यातील ११ जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर्स दिले हाेते, ते बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार नाशिक जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागाचे २ व्हेंटिलेटर्स बंद ठेवण्यात आले आहे.अमरावती रुग्णालयात शाॅर्टसर्किटमुळे आग लागली होती. राज्यात हाफकिनस्तरावरुन एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून हे व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत.

तपासणीनंतरच वापर
एसएनसीयू विभागात २ व्हेंटिलेटर आहेत. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार उपकरणे बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयातील दाेन उपकरणे बंद आहेत. तपासणी केल्यानंतर ही उपकरणे सुरू केली जातील.

- डाॅ. अशोक थोरात,जिल्हा शल्यचिकित्सक

बातम्या आणखी आहेत...