आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट उधळला:तडिपारांकडे आढळले 2 गावठी कट्टे, 3 जिवंत काडतुसे; घातपाताचा कट उधळला

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पोलिसांनी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारांकडे दाेन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आले. देवळाली कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी (दि. १७) पहाटे भगूरच्या विजयनगर येथे ही कारवाई केली. सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. टोळी घातपात करण्याच्या उद्देशाने जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्रशांत नानासाहेब जाधव, अतिष कैलास निकम, सागर किसन कोकणे, रोहन संजय माने, रहेमान जाफर शेख, गौरव बाळासाहेब फडोळ असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शस्त्र प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशान्वये शहरात धडक कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पथक भगूरला विजयनगर परिसरात गस्त करत असताना एका हाॅटेल परिसरात पाच ते सहा संशयित गावठी कट्टे घेऊन जमा झाले असून काहीतरी घातपात करण्याचा उद्देश असल्याची माहिती मिळाली. या आधारे पथकाने परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. अंगझडतीत दोघांच्या कमरेला दोन गावठी कट्टे, ३ जिवंत काडतूस आढळले. वरिष्ठ निरीक्षक कुंदन जाधव, डीबीचे राहुल मोरे, प्रकाश गिते, संदेश पाडवी, लियाकत पठाण, वैशाली मुकणे, बाळकृष्ण गांगुर्डे, सुनील जगदाळे, भाऊसाहेब ठाकरे, श्याम कोटमे, सुभाष जाधव, चंद्रभान भोईर, एकनाथ बागूल, नितीन करवंदे यांच्या पथकाने उपआयुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

परराज्यातून आणले हत्यार संशयित तडीपार काळात शहरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. परराज्यातून गावठी कट्टे मागवल्याचे निष्पन्न झाले आहे. कट्टे पुरवणाऱ्या इसमाचे नाव निष्पन्न झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...