आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर:पालिकेकडून 20 खाटांचा गोवर संसर्गजन्य कक्ष सुरू

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गाेवरचे चार संशयित रुग्ण असून त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या हाफकिन लॅबमध्ये पालिकेने पाठविले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला असून डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात २० खाटांच्या गोवर संसर्गजन्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.गाेवरचा प्रसास मुंबईनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये होण्यास सुरवात झाली. मुंबईत गोवरमुळे तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

नाशिकमध्ये मागील आठवड्यापर्यंत गोवरचा एकही रुग्ण नव्हता. तसेच, वैद्यकीय विभागाकडून शहरात गोवरची लक्षणे असलेली मुले शोधण्याचे काम ही सुरू होते. या पार्श्वभूमीवर महापालिका अलर्ट मोडवर आली असून यासाठी जुने नाशिक येथील कथडा भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात २० खाटांचे गोवर संसर्गजन्य कक्ष तयार करण्यात आले आहे. या कक्षासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय विभागांकडून सांगण्यात आले.

पालिका अलर्ट मोडवर
महापालिकेकडून डॉ. हुसेन रुग्णालयात संसर्गजन्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, बिटको रुग्णालयातील बालरोग कक्षातदेखील गोवरच्या रुग्णांवर उपचार केले जात आहे. वैद्यकीय विभागाच्या सर्वेक्षणामध्ये चार बालके गोवर संशयित आढळले. मात्र,नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही,महापालिका अलर्ट आहे. - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

बातम्या आणखी आहेत...