आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान:20 कुटुंबियांनी दाेनदा घेतले काेराेना अनुदान; पैसे परत न केल्यास गुन्हा

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजारांचे अनुदान शासनाकडून महापालिकेमार्फत दिले. यात २० कुटुंबियांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम २ वेळा वर्ग झाल्याची माहिती तपासणीत पुढे आली. प्रशासनाने या कुटुंबियांना हे अनुदान परत करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, ते परत न केल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मनपा वैद्यकीय विभागाने दिला आहे.

काेराेनाकाळात कुुटुंबाचा प्रमुखच बळी ठरल्याने मोठा आघात सहन करावा लागला आहे. अशा संकटाच्या काळात कुटुंबांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने गेल्यावर्षी सप्टेंबरपासून कोरोेनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांचे अनुदान वर्ग करण्याचे काम हाती घेतले. शहरात १० हजार ८३० प्राप्त अर्जांची छाननी करून ९४०३ कुटुंबांना अर्थसहाय्य मंजूर करून ते खात्यातही जमा झाले आहे. जवळपास २० लाभार्थी असे की ज्यांनी कोरोना अर्थसहाय्याचे अनुदान दोन वेळा घेतले आहे. अशा कुटुंबियांचा शाेध घेऊन त्यांना एका अनुदानाची रक्कम शासन जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...