आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाण्यातील शिवसेनेचे वाघ’ अशी ओळख असलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेनेत भूकंप आणल्यानंतर त्याचे हादरे नाशिक शिवसेनेला बसल्याचे चित्र आहे. नाशिक महापालिकेतील गेल्या पंचवार्षिक काळातील ३५ पैकी २० पेक्षा अधिक नगरसेवक शिंदे यांच्या संपर्कात असल्याची याआधी चर्चा होती. या सर्वांची आता कोडी झाली आहे.
नगरविकास खात्यामुळे गेल्या अडीच वर्षांत शिंदे हेच नाशिक महापालिकेतील नगरसेवक किंबहुना पदाधिकाऱ्यांसाठी ‘साहेब’ होते. पालिकेतील कोणत्याही कामाचा संबंध थेट नगरविकास खात्याशी असल्यामुळे तत्कालीन सत्ताधारी भाजपसंदर्भातील तक्रारी असो की, शहरात विविध विकासकामांसाठी मूलभूत सेवा याेजनेंतर्गत निधी आणणे किंबहुना विकासकामांची उद्घाटने करण्यासाठी शिंदे यांच्याशिवाय पान हलत नव्हते. नाशिक महापालिकेतील गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात ३५ नगरसेवक असताना त्यातील वीसपेक्षा अधिक नगरसेवक थेट संपर्कात असल्याची चर्चा अनेकवेळा झाली होती.
राज ठाकरे यांच्यानंतर दुसरा दणका..
२००५ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता झेंडा हाती घ्यायचा असा पेच होता. त्यावेळी वसंत गिते, सचिन ठाकरे, अतुल चांडक असे अनेक नेते मनसेत आले होते. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत करिष्मा दाखवल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार दत्ता गायकवाड यांचा पराभव झाला होता. दरम्यान, आताही नाशिक शिवसेनेत संजय राऊत व शिंदे असे दोन गट कायमच चर्चेत असतात. शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपत प्रवेश केल्यास त्यांच्यामागे एक मोठा गट जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.