आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक सुविधांपासून वंचित:गायत्री परिवारातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना 20 हजार वह्या

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित रहावे लागते. यामुळे असे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जातात. याच पार्श्वभूमीवर अखिल विश्व गायत्री परिवाराने आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत २० हजार वह्यांचे वाटप केले.

आदिवासी गरीब विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती व्हावी या भावनेने अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज हरिद्वार नाशिक शाखेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडाेरी या भागातील जवळपास ४ हजार विद्यार्थ्यंाना २० हजार वह्यांचे वाटप करण्यात आले. आदिवासी क्षेत्रातील निवासी मुलींच्या वसतीगृहात चांगल्या सुविधा देण्यात आल्या. डांग सेवा मंडळाच्या निवासी आश्रमशाळेत शैक्षणिक साहित्यांची मदत केल्याचे अमृत पटेल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...