आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:फाळके स्मारकाला 20 हजार पर्यटकांची भेट

सिडको5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी सण आणि त्यानंतरच्या सुट्ट्या तसेच शनिवार आणि रविवारमुळे पांडवलेणी व फाळके स्मारकात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. डोंगरावरची ट्रेकिंग तसेच निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी नाशिककरांसह अन्य भागातूनही दिवसांपासून हौशी पर्यटक या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी येताना दिसून आले. मनपाकडील नाेंदीनुसार वीस हजाराहून अधिक पर्यटकांनी फाळके स्मारकास भेट दिली असून पालिकेला प्रवेश शुल्कातून एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दिवाळीच्या सुटीत घरापासून दूर निवांत पर्यटनस्थळी भेट देण्याचे प्रमाण वाढले आहे.

निसर्गरम्य वातावरण व पुरातन लेणी पाहण्यासाठी नाशिकच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या पांडवलेणी तसेच फाळके स्मारक बघण्यासाठी गर्दी होत आहे. त्यात शनिवार व रविवारी असणाऱ्या सुटीमुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. यावेळी फाळके स्मारकाच्या बाहेर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून येत आहेत. यावेळी बच्चेकंपनीने येथील घसरगुंड्या व झोके खेळण्याचा आनंद लुटला.

एक लाख रुपये उत्पन्न
दिवाळी आणि त्यानंतर शनिवार व रविवार वीकेंडच्या सुटीमुळे फाळके स्मारकातील निसर्गरम्य वातावरण व संगीत कारंजा, उद्यान, शस्त्र संग्रहालय बघण्यासाठी लहान बालगोपाळांसह महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक अशा २० हजाराहून अधिक नागरिकांनी फाळके स्मारकात प्रवेश घेतला. तब्बल एक लाखाहून अधिक महसूल या दिवसात मनपा प्रशासनाला मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...