आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 20 Universities Participating In Research Innovation; This Year Pune University Has The Honor Of Organizing The State Level Competition| Marathi News

स्पर्धेचे आयोजन:संशाेधन आविष्कार मध्ये २० विद्यापीठांचा सहभाग; राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचा मान यंदा पुणे विद्यापीठाला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांमधील संशोधन आणि नवीन कल्पनांना चालना देणाऱ्या ‘आविष्कार’ स्पर्धेचे आयोजन पुन्हा करण्यात आले आहे. स्पर्धेच्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे काॅलेज बंद असल्याने स्पर्धा झाली नव्हती. यंदाच्या स्पर्धेत राज्यातील एकूण २० विद्यापीठांतील विद्यार्थी आपले संशोधन प्रकल्प सादर करतील.

स्पर्धेतील संशोधन प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञ परीक्षक राहणार असून त्यात काही परीक्षक हे इतर राज्यांतीलही असतात. २००६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षीची आविष्कार २०२२ ही स्पर्धा १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये तसेच २५ ते ३० वर्षे जुन्या महाविद्यालयांमध्ये राबविण्यात यावी, अशा सूचनाही विद्यापीठाने केल्या आहेत. या वर्षाअखेर यंदाच्या या अंतिम स्पर्धा होणे अपेक्षित आहे. याबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाचे सहायक कुलसचिव श्रीकांत गायकवाड यांनी दिली.

१५ सप्टेंबरपर्यंत स्पर्धेसाठीचा कालावधी, अशी होईल आविष्कार स्पर्धा
आविष्कार स्पर्धा सुरुवातीला महाविद्यालयस्तरावर, त्यानंतर विभागीयस्तरावर, त्यानंतर जिल्हा आणि विद्यापीठस्तरावर होते. विद्यापीठस्तरावरून निवड झालेले विद्यार्थी पुढे राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धेत पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधनाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापकदेखील सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकासोबतच शिष्यवृत्तीदेखील देण्यात येते.

असे असतील प्रकल्प
मानवता, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधे आणि फार्मसी अशा वेगवेगळ्या विभागांतून पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी. आणि प्राध्यापकवर्गही आपले संशोधन प्रकल्प सादर
करू शकतील.

बातम्या आणखी आहेत...