आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी येथे २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आ. अॅड. राहुल ढिकले यांनी केलेला पाठपुरावा तसेच जिल्हा नियाेजन समितीत पालकमंत्री दादा भुसे यांनी पंचवटी व सिडकाे येथे दाेन रुग्णालये उभारण्याबाबत दिलेल्या आदेशाची दखल घेत पालिकेच्या वैद्यकीय विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे.
एका रुग्णालयासाठी ५५ काेटी याप्रमाणे ११० काेटी रुपपे खर्च दाेन रुग्णालयांसाठी येणार आहे. नगररचना विभागाने जागा निश्चिती केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. नाशिक शहरात महापालिकेची चार माेठी रुग्णालये आहेत. त्यात नाशिकराेड येथील बिटकाे रुग्णालयाची क्षमता ४५० बेडची आहे. या व्यतिरिक्त जुने नाशिक येथे डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालय, सिडकाेत माेरवाडी रुग्णालय तसेच पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय आहेत.
फास्ट ट्रॅकवर पाठपुरावा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकाेनातून पंचवटीत२०० खाटांच्या रुग्णालयासाठी केंद्र व राज्य शासनाकडे फास्ट ट्रॅकवर पाठपुरावा केला जाईल. नागरिकांना स्वस्तात व चांगले उपचार देण्यासाठी रुग्णालय महत्त्वाचे आहे. - आ.अॅड. राहुल ढिकले
तयारी अंतिम टप्प्यात
पंचवटी व सिडकाे या दाेन्ही ठिकाणी जागा निश्चिती झाल्यानंतर राज्य शासनाकडे पालिका प्रस्ताव पाठवणार आहे. वैद्यकीय विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.- डाॅ बापूसाहेब नागरगाेजे, वैद्यकीय अधीक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.