आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:विभागीय जलतरण स्पर्धेत 200 स्पर्धकांचा सहभाग

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नाशिक जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विभागीय शालेय जलतरण स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे आयाेजित नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे ,अशी चार विभागातून २०० मुला मुली यात सहभागी झाले हाेते.

जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम वद्वितीय क्रमांक आलेला ते स्पर्धेक यात सहभागी .a त्याचे विभागीय स्पर्धा चे आयोजन करण्यात आले . बॅकस्ट्रोक, फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय ,डायव्हिंग ,वॉटर पोलो प्रकारात स्पर्धक सहभागी झाले हाेते.यावेळी क्रीडा अधिकारी महेश पाटील ,हाैशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष विश्वकर्मा शार्दुल,तरण तलाव व्यवस्थापक माया जगताप आदी उपस्थित हाेते. विभागीय स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.तसेच िवजयी ठरलेल्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...