आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन सोशल ग्रुप प्लॅटिनम नाशिक या सामाजिक संस्थेचा पदग्रहण सोहळा नुकताच माेठ्या उत्साहात पाडला. अध्यक्षपदी हेमा लुंकड तर सचिवपदी धीरज पिचा यांची निवड करण्यात आली. जैन साेशल ग्रुपचे ३५० कुंटूब सदस्य आहे. या सर्व कुटुंबांतील २००० हून अधिक सदस्यांची माेफत आराेग्य तपासणी तसेच विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष हेमा लुंकड यंानी स्पष्ट केले.
जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम यूथच्या अध्यक्षपदी आदित्य खाबिया तसेच सेक्रेटरीपदी कार्तिक शहा यांची निवड करण्यात आली. जैन साेशल ग्रुप प्लॅटिनमचा पदग्रहण साेहळा गाेविंदनगर येथील थ्री लिव्हज येथे आयाेजित करण्यात आला हाेता.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमा हिरे, जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे माजी अध्यक्ष मोहन बागमार, बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे, दीपा चंदे, अमर छाजेड, नामको हॉस्पिटलचे चेअरमन सोहनलाल भंडारी, उद्योजक वर्धमान लुंकड, ललित मोदी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत यश टाटीया यांनी केले प्रास्ताविक सम्यक सुराणा यांनी व आभार धीरज पिचा यांनी मानले सूत्रसंचालन पौर्णिमा सराफ यांनी केले. सर्व कार्यकारणीस शपथ सतीश हिरण यांनी दिली.
जैन साेशल ग्रुपच्या नूतन कार्यकरिणीत यांचा सहभाग
सम्यक सुराणा, पंकज पटणी, डॉ.अतुल जैन, कीर्तीभाई शहा, नितीन राका, संदीप लुंकड, इलेक्ट प्रेसिडेंट दिपेश पारख, यश टाटीया, निलेश कोचर, गौतम भंडारी, प्रितीश चोपडा, सुनिल कोठारी, कमलेश कोठारी, कल्पना पटणी, किरण खाबिया, राहुल पारख यांच्यासह संचालकांची निवड करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.