आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटा छपाईसाठी आता 208 कोटींची अत्याधुनिक मशिनरी:ऑस्ट्रिया आणि जपान देशातून येणार मशिनरी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील इतर नोट प्रेसच्या स्पर्धेमध्ये नाशिक येथील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया करन्सी नोट प्रेस ही कायम टिकवून रहावी यासाठी जुन्या मशिनरीऐवजी नवीन अत्याधुनिक मशिनरींची अनेक दिवसांपासून मजदूर संघाच्या वतीने मागणी करण्यात येत होती. अखेर या मागणीला यश मिळाले असून आँस्ट्रिया आणि जपान या देशातील अत्याधुनिक मशिनरीसाठी केंद्राने हिरवा झेंडा दिली असून त्यासाठी २०८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. येत्या चार महिन्यात ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचे आयएसपी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

गोडसे व जुंद्रे यांनी सांगितले, की यापूर्वीची मशिनरी ही जुनी झाली आहे. परंतु देशातील इतर प्रेससोबत स्पर्धा करायची असेल तर प्रथम अत्याधुनिक यंत्रणा सज्ज करावी लागणार होती. काही महिन्यांपूर्वी करन्सी नोट प्रेसला मशिन आली असून एक इन्टाँग्लिओ मशीन व एक नंबरिंग मशीन बसवण्यात आली आहे. नवीन अत्याधुनिक यंत्रणा खरेदीचे आदेश प्राप्त झाले आहे. यामध्ये आँस्ट्रियामधून ४ सुपर सायामल्टन मशीन येणार आहे. यामध्ये तीन करन्सी नोट प्रेसला तर एक इंडिया सिक्युरिटी प्रेसला देण्यात येणार आहे. जपान मधून ६० कोटी रुपयांची इंटग्लियो मशीन येणार आहे. तसेच ६० कोटी रुपये किमतीचे २ कट अँन्ड पँक फिनिशिंग मशीन, तसेच ९० कोटी रुपयांचे ३ नंबरिंग मशीनची खरेदी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पासपोर्ट साठी देखील जपान येथील एका खासगी कंपनीला आँर्डर देण्यात आले आहे. या अत्याधुनिक यंत्रणेसाठी मुख्य व्यवस्थापक तृप्तीपात्रा घोष,एस के सिन्हा, अजय अग्रवाल, बाेलेवर बाबु, राजेश बन्सल यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.