आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:ऑनलाइन कारची बुकिंग करणाऱ्या पीएसआयला 22 हजार रुपयांना गंडा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाईन कार बुकिंग करण्यासाठी रेन्ट अ कार वेबसाईटवर काॅल केल्यानंतर अॅप डाऊनलोड करण्यास सांगून पोलिस उपनिरीक्षकाला डेबिट कार्डचा नंबर विचारत बँक खात्यातून २२ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित मोबाईलधारकाच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबईला जाण्यासाठी कार बुक करण्यासाठी संकेतस्थळावर लाॅगिंग केले असता अनोळखी नंबरहून फोन आला. संशयिताने कार बुकिंगसाठी अॅप डाऊनलोड करण्यास सांगून २२ हजार रुपये खात्यातून काढून घेतले.

बातम्या आणखी आहेत...