आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:देवळालीत २२ रेल्वेंना थांबा नाही; जवानांसह नागरिक त्रस्त

देवळाली कॅम्प3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली रेल्वेस्थानकात काेराेनाकाळात बंद केलेल्या २२ रेल्वेगाड्यांचा थांबा पुन्हा नियमित करावा, अशी मागणी देवळाली कॅन्टोमेन्टचे माजी उपाध्यक्ष व भाजप पदाधिकारी भगवान कटारिया, तानाजी करंजकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरही देवळाली स्थानकात २२ रेल्वेगाड्या थांबत नाहीत. याबाबत रेल्वेकडे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेतली जात नाही. गाड्यांचा थांबा नसल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, मजूर, महिलावर्ग आदींचे हाल होत आहेत.

मुंबईसह इतरत्र प्रवासासाठी भगूर-देवळाली कॅम्पपासून दहा किलोमीटरवरील नाशिकरोड स्थानकात जावे लागते. त्यामुळे पैसा, वेळ व श्रम निष्कारण खर्ची पडतात. रिक्षातून नाशिकरोड गाठण्यासाठी दोनशे रुपये भाडे द्यावे लागते. देवळाली, भगूरच्या प्रवाशांना मानसिक व शारीरिक त्रासही होतो. रहिवासी, व्यावसायिक, सैन्यदलातील जवानांना होणारा त्रास लक्षात घेऊन पूर्वीप्रमाणेच महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना देवळाली कॅम्प येथे थांबा द्यावा, अशी मागणी दानवे यांनी दिलेल्या निवेदनात कटारिया यांच्यासह रिपाइंचे सुभाष बोराडे, दीपक उन्हवणे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...