आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप‎ व्यक्त:2200 गाळे बंद ठेवत‎ महापालिकेचा निषेध‎

नाशिक‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिका आयुक्तांनी महापालिकेच्या ‎गाळेधारकांना थकबाकीची रक्कम ‎भरण्यासाठी तीन महिन्यांचा एक टप्पा‎ या प्रमाणे मुभा दिल्यानंतरही ‎कर्मचाऱ्यांकडून थकबाकीपाेटी गाळे‎ सील करण्याची माेहीम सुरूच‎ असल्याने गाळेधारकांमध्ये संताप‎ व्यक्त हाेत आहे. याविराेधात साेमवारी ‎(दि. ६) शहरातील २२००‎ गाळेधारकांनी सकाळी १० ते १२ या‎ वेळेत दुकाने बंद ठेवून प्रशासनाचा‎ निषेध केला.‎ महापालिकेने गाळेधारकांवर‎ भरमसाठ भाडेवाढ लादली आहे.‎ यासाठी गाळेधारक संघटनेचा गेल्या‎ १० वर्षांपासून लढा सुरू आहे.‎

अर्थसंकल्पीय अधिवेनशाच्या‎ पहिल्याच दिवशी गाळेधारक‎ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार‎ सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री‎ ‎ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन‎ अन्यायकारक भाडेवाढ कमी‎ करण्याची मागणी केली. फडणवीस‎ यांनीही आयुक्तांशी भ्रमणध्वनीवर‎ संपर्क साधून धाेरण ठरविण्याबाबतची‎ सूचना केली. दुसऱ्याच दिवशी‎ आयुक्तांनी गाळेधारक संघटनेच्या‎ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तीन तीन‎ महिन्यांचा हप्ता करून थकीत रक्कम‎ भरण्यास सांगितले. असे असतानाही‎ मनपाच्या विविध कर वसुली पथकाकडून मार्च‎ एन्डच्या नावाखाली थकबाकीदारांचे‎ गाळे सील करण्याची प्रक्रिया राबवली‎ जात आहे.

या विराेधात शिवाजीराेड,‎ मेनराेड, पंचवटी, भद्रकाली, नाशिकराेड,‎ सातपूर खाेका मार्केट, छत्रपती शिवाजी‎ महाराज भाजी मंडई, इंदिरा गांधी मार्केट‎ सातपूर काॅलनी, शिवाजीनगर मार्केट,‎ आनंदवली मार्केट, महात्मानगर शाॅपींग‎ सेंटर अशा विविध भागातील‎ व्यावसायिकांनी गाळे बंद ठेवत‎ प्रशासनाचा निषेध नाेंदवला.‎‎

या आहेत गाळेधारकांच्या‎ मागण्या‎
नवीन भाडेवाढ २०१७ पासून‎ रेडीरेकनर नुसार २ ते ३ टक्क्यानुसार‎ असावी. गाळे भाड्यावर जीएसटी‎ आकारावा. इतर सर्व कर मालमत्ता‎ करात कायद्याप्रमाणे आकारणी‎ करावी. इमातीनुसार आरसीसी,‎ लाेडबेरींग, व सिमेंट पत्रे‎ असलेल्यांचे मुल्यांकन करून‎ आकारणी करावी.‎

उच्च न्यायालयाला‎ करणार विनंती
गाळेधारक संघटनांनी‎ अन्यायकारक भाडेवाढीबाबत‎ न्यायालयात दाद मागितली‎ हाेती. मात्र त्यांच्या विराेधात‎ निकाल गेल्यामुळे आता‎ उच्च न्यायालयात विनंती‎ करण्यात येणार आहे. - नरेंद्र‎ वाळुंजे, संघटनेचे‎ पदाधिकारी‎

बातम्या आणखी आहेत...