आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती प्रदान:ब्ल्यू क्राॅसतर्फे 15 विद्यार्थ्यांना 2.25 लाखांची शिष्यवृत्ती

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिकदृष्ट्या मागास व गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणासाठी मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने ब्ल्यू क्राॅस कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मविप्रच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमधील १५ विद्यार्थ्यांना सव्वा दोन लाखांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत केले गेले. ब्ल्यू क्राॅस कंपनीतर्फे हर्षल सोनवणे, तन्वी उपाध्ये, यश मोहिते, मयूर पाटील, शुभम सावंत, नीता वलवे, तनुजा डेर्ले, निशा वलवे यांच्यासह १५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. यावेळी प्राचार्य प्रशांत पाटील व शिक्षक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...