आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेमेंट बँक:इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲपमुळे ग्राहकांना २४ तास पोस्टाची सेवा

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोस्ट विभागामार्फत ग्राहकांच्या सेवेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवा सुरू करण्यात आली असून या ॲपच्या माध्यमातून पी.एल.आय. आणि आर.पी.एल.आय.चे दरमाह हप्ते ऑनलाइन स्वरूपात भरता येणार आहे. ग्राहकांसाठी २४ तास सेवा उपलब्ध होणार असून या सुविधेचा अधिकाधिक पोस्टाच्या ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी आयपीपीबी खाते असणे गरजेचे आहे. खाते उघडल्यानंतर आपल्या मोबाइलमधील प्ले स्टोअरच्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँकिंग ॲप डाऊनलोड करावे, त्यातील पोस्ट ऑफिस सर्व्हिस या ऑप्शनमध्ये पोस्ट लाइफ इन्शुरन्स या पर्यायाच्या माध्यमातून ग्राहकांना घरी बसून काही मिनिटांतच भरणा करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून स्टँडिंग इन्स्ट्रक्शनद्वारे आपल्या प्रीमियमचा भरणा तसेच ऑटो कटिंगदेखील करता येणार आहे. याबरोबरच आर.डी., पी.पी.एफ., सुकन्या समृद्धी योजना इत्यादींचाही भरणा या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे.याबाबतची अधिक माहिती जवळच्या पोस्ट कार्यालयातून प्राप्त करावी, असे आवाहन असे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी ग्राहकांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...