आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना:गावठाणात 24 तास पाणीपुरवठा करण्याचा मार्ग होणार मोकळा

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावठाण भागात सुरू असलेल्या पायाभूत विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने ४ टाक्यांपैकी ३ टाक्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे, ११११ मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. मार्च २०२३ पर्यंत १०० टक्के काम पूर्ण करण्याच्या सूचना कंपनीच्या वतीने देण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेमधून गावठाण भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी योजना राबविल्या जात आहे.

त्यात मुख्यत्वे ४ जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील पंचवटी मोटार डेपो व दीक्षित वाडा येथे प्रत्येकी २० लाख लिटर क्षमतेची एक टाकी आहे. गोल्फ मैदान येथे देखील वीस लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारला जाणार आहे. पंचवटी डेपोतील टाकीचे काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२३ पर्यंत कामे पूर्ण करण्याची मुदत ४ पैकी ३ टाक्यांचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

११०० मीटर जलवाहिन्या
घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांचे काम हाती घेतले असून ३५० ते ९०० मिलिमीटर अशा विविध व्यासांच्या जलवाहिन्यांचे ९३६७ मीटर कामे आहेत. यातील ११११ मीटर जलवाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात आल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...