आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यसाठा जप्त:कुरिअर ट्रकमधून 24 लाखांचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची द्वारका परिसरात कारवाई, गोवानिर्मित मद्यसाठा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा राज्यात निर्मित मद्याची कुरिअरच्या आड तस्करी करणारा ट्रक पकडण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने द्वारका येथे ही कारवाई केली. ट्रकसह २४ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. द्वारकामार्गे धुळ्याकडे मद्य वाहतूक केली जाणार होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथकाला कुरिअर कंपनीच्या ट्रकमधून मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने द्वारका परिसरात सापळा रचत संशयित ट्रक (एमएच ४८ टी १६२८) एका दुकानापुढे उभा असल्याचे

निदर्शनास आले. पथकाने चालकाची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. संशय बळावल्याने पथकाने ट्रकचे मागील दरवाजे उघडले असता कुरिअरच्या बॉक्समध्ये मद्याचे बॅाक्स असल्याचे निदर्शनास आले. पथकाने सर्व बॅाक्स तपासत ट्रकसह २४ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. संशयित चालक मोहनलाल भगीरथ बिश्नोई (रा. जालोर, राजस्थान) यास अटक करण्यात आली. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली. कारवाईचे आयुक्त कांतीलाल उमप, संचालक उषा वर्मा यांनी अभिनंदन केले.

मुख्य तस्करापर्यंत पोहोचणार का ? : मद्य वाहतूक करताना चालकाला पथकाने अटक केली. मात्र हा साठा नेमका धुळे येथे जाणार होता की शहरातील मद्यविक्रेत्याकडे उतरवला जाणार होता याबाबात विभागाकडून ठोस माहिती मिळू शकली नाही. शहर व जिल्ह्यात अवैध मद्यतस्करी होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...