आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गर्शन केंद्राच्या वतीने मंगळवारी (दि. १४) मालेगाव येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात तब्बल ५०२ बेरोजगारांनी नोंदणी केली. त्यातील २४५ युवांची नोकरीसाठी प्राथमिक निवडही करण्यात आली तर १२ जणांना थेट नियुक्तिपत्र देत नोकरीवर रुजू होण्याचे आदेशित करण्यात आले. मेळाव्यात १५ नामांकित कंपन्या आणि नियोक्ते स्वत: उपस्थित होते. तब्बल १६०० रिक्त पदांसाठी यावेळी मुलाखती घेण्यात आल्या.
पण केवळ ५०२ उमेदवारांनीची नोंदणी करत हजेरी लावली. त्यातून २४५ जणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. दहावी, बारावी तसेच कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी, एम.बी.ए., नर्सिंग, डॉक्टर इ. विविध शैक्षणिक पात्रताधारकांसाठी हा मेळावा आयोजित केला होता. अनेक उमेदवारांनी कर्ज योजनांची माहिती घेतली. तसेच त्यासाठी आवश्यक बाबींही जाणून घेतल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.