आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दाेन दिवसांत 25 तास वीज खंडित

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर आणि परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवसांत तब्बल २५ तासांहून अधिक वेळ वीजपुरवठा खंडित झाल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला.

गुरुवारी दुपारपासून शहरात वीजपुरवठा खंडित झाला हाेता. शुक्रवारीही हीच परिस्थिती होती. गणेशोत्सवात आरास सजावटी करण्याचे काम सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला. महावितरण कर्मचारी फोन उचलत नसल्याबद्दल तक्रार पुस्तकात लेखी नाेंद केली. दोस्ती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेत कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

एफसीआय रोडवरील कार्यालयातील दूरध्वनीचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला जातो. ग्राहकांना माहिती दिली जात नाही. महावितरणच्या गलथान कारभारामुळे मनमाडकर त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सवात महावितरणने अखंडित वीजपुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी दिला आहे. तारा तुटणे, जंप तुटणे, ओव्हरलोड होणे, फ्यूज उडणे, टान्सफाॅर्मर खराब होणे अशा कारणांनी विजेचा लपंडाव सुरू आहे. गुरुवारी दुपारनंतर शिवाजीनगर, हुडको, विवेकानंदनगर, आययूडीपी भागात अंधार हाेता. मनमाड शहर पोलिस ठाण्यात झालेल्या शांतता समितीत गणेशोत्सवकाळात अखंडित वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासन अभियंता एस. बी. शिंदे यांनी दिले हाेते. पण दुसऱ्याच दिवशी अधिकारी तोंडघशी पडले.

वाघदर्डी फीडर खराब झाल्याने अडचण
वाघदर्डी फीडर खराब झाल्याने ते बंद पडले आहे. यामुळे मनमाड शहराच्या विविध भागांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तो सायंकाळी पाच वाजता सुरू झाला.- एस. बी. शिंदे, शहर अभियंता, महावितरण

बातम्या आणखी आहेत...