आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील दोन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलपैकी एक असलेल्या नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र निधीची तरतूद नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयाची एक कोटी ९३ लाख १८ हजार १६८ रुपये पाणीपट्टी थकीत आहे. त्याचबरोबर, वीज व दूरध्वनीचेही २४ लाख ९१ हजार ५८० रुपयांचे बिल थकल्याचे समोर आले आहे. यावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत...
राज्य शासनाकडून २००८ मध्ये नाशकात उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा पुरविण्याच्या हेतूने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयात केवळ उत्तर महाराष्ट्रातीलच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातूनही नागरिक उपचारासाठी येतात. महात्मा फुले जनआराेग्य योजनेचा सर्वाधिक लाभ या रुग्णालयाने रुग्णांना प्राप्त करून दिला आहे.
संदर्भ रुग्णालयात ह्रदयरोग, मूत्रपिंड व कर्करोगग्रस्तावर उपचार केले जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या शंभर खाटांचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध बिलांसह यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामांनाही अडचण येत आहे. संदर्भ रुग्णालयातील कामकाजासाठी स्वतंत्र निधी देण्याकडे आरोग्य मंत्रालयच उदासीन आहे. शासकीय रुग्णालयांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जात असताना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी असा स्वतंत्र निधी नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विकास खुंटला असून दीनदुबळ्यांना सुपरसेवा मिळण्यास अडचणी येत आहेत.
रुग्णालयातील पाणीपट्टी व विद्युत व दुरध्वनीचे बिल थकलेले असून यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर, कार्डिआेलॉजिकतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओथेरेपिस्ट आदी तज्ज्ञ अधिकाऱ्यांना नाममात्र मानधन दिल्याने ते पूर्णवेळ सेवा देत नाहीत. आरोग्य कर्मचाऱ्यांचीही नेमणूक कंत्राटी पद्धतीने आहे. त्यामुळे रुग्णांसाठी मोठी समस्या उद्भवते. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी स्वतंत्र निधीचे नियोजन आरोग्य मंत्रालयाने केलेले नाही. महागड्या यंत्रणा व तज्ज्ञ डॉक्टर आहेत. परंतु, त्यांना मिळणाऱ्या सुविधा व निधी नसल्याने त्याचा त्रास रुग्णांना होत आहे.
महापालिकेकडून रुग्णालय प्रशासनाला नोटीस
सरकारी रुग्णालय असले तरी त्यांना महापालिकेचा पाणीपट्टी व मालमत्ताकर भरणे बंधनकारक आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेचा कुठलाच कर अदा करण्याची जबाबदारी नाही या आविर्भाव
१४ वर्षांपासून थकबाकी
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयासह काही शासकीय कार्यालये असताना महापालिकेने दणका देत यांना नोटिसा बजावत कर अदा करण्याच्या सूचना दिल्या. संदर्भ रुग्णालयाची १ कोटी ९३ लाख १८ हजार १६८ रुपये पाणीपट्टी थकीत असून मध्यंतरी रुग्णालय प्रशासनाकडून केवळ चार लाख रुपये भरण्यात आले होते.
दर महिन्याला पाठवतोय समरणपत्र
संदर्भ रुग्णालयाचे सुमारे दोन कोटी पाणीपट्टीचे बिल थकीत असून रुग्णालय प्रशानाला महापालिकेकडून सतत पाठपुरावा केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाकडून आरोग्य सहसंचालकांनाही पत्र पाठवून निधीची मागणी केलेली आहे. सोमवारी यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाबरोबर बैठकही आहे. पूर्व विभागाकडून आम्ही दरमहिन्याला रुग्णालयाला पट्टी भरण्याचे स्मरणपत्र पाठवत आहे. - राजाराम जाधव, विभागीय अधिकारी, पूर्व विभाग
निधी मिळाल्यानंतर बिल भरणार
संदर्भसेवा रुग्णालयाचे पाणीपट्टीचे बिल थकीत आहे. त्यात काही पेमेंट महापालिकेला करण्यात आलेले आहे. उर्वरित रक्कम ही लवकरच अदा केली जाणार आहे. तसेच, विद्युत व दुरध्वनीचे ही काही बील अदा केलेले आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर हे बील ही अदा केली जाईल. - डॉ. विलास पाटील, वैद्यकीय अधीक्षक, संदर्भ सेवा रुग्णालय
रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता
संदर्भ सेवा रुग्णालयाचे विद्युत व दुरध्वनीचे ही २४ लाख ९१ हजार ५८० रुपयांचे बिल थकल्याचीही माहिती समोर आली आहे. महावितरण कंपनीने वारंवार पाठपुरावा करूनही रुग्णालयानी थकबाकी भरली नसल्याची माहिती समोर आली असून यामुळे रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इमारत बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला नाही
संदर्भ रुग्णालयाच्या इमारतीस बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही नसल्याची धक्कादायक माहिती डी. बी. स्टारला प्राप्त झाली आहे. त्यामुळे महापालिकेचा मिळकत कर ही मागील २००९ पासून बुडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.