आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिठाईचे दुकान फोडून 15 लाख लंपास:चाेरीच्या इतर 3 घटनांत 25 ला‌खांचा ऐवज चाेरीस

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूररोडवरील मिठाईच्या दुकानातून १५ लाखांची रक्कम लंपास करण्यात आली. सागर स्वीट, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात एकाच रात्री चार घरफोडीच्या गुन्ह्यात सुमारे २५ लाखांचा ऐवज चोरी करण्यात आला. मिठाई दुकानमालक रतन चौधरी (रा. लवाटेनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याच मालकीच्या शेजारील आॅफिसच्या दरवाजाचे लॅच उचकवून चाेरट्यांनी स्वीट मार्टमध्ये प्रवेश केला. लाकडी टेबलच्या ड्राॅवरमध्ये ठेवलेली सुमारे १५ लाखांची रोकड चोरी करून नेली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चाेरट्याची छबी दिसून आली. सकाळी चाेरीचा प्रकार उघड झाला.

चाेरीची दुसरी घटना सातपूर येथे घडली. सुनील निगळ (रा. निगळ मळा, सातपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घराचे दरवाजाचे कुलूप तोडून ५३ हजारांचे सोन्याचे दागिने आणि एलईडी टीव्ही चोरी करून नेला. सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल शुक्ला ( रा. शास्त्रीनगर, गोरेवाडी) यांच्या तक्रारीनुसार, शुक्ला कुटुंबियासह लग्न समारंभाला गेले असताना बंद घराचा दरवाजा तोडून घरातील कपाटात ठेवलेले दागिने असा ३३ हजारांचा ऐवज चोरी केला. तिसऱ्या घटनेत गीता सिंग (रा. नवी मुबंई) यांच्या देवळालीतील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून १ लाख ४१ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केले.

बातम्या आणखी आहेत...