आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्याचा ओढा जास्त असला तरी गेल्या काही वर्षांत इंजिनिअरिंग व इतर काही शाखांमध्ये वाढलेला कल कमी झाल्याचे दिसून येतआहे. इंजिनिअरिंगच्या राज्यात ४० ते ५० टक्के जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचा कलआता विज्ञान, वाणिज्य, कला या पारंपरिक शाखांमधील नवीन अभ्यासक्रमांकडे वाढलाआहे. त्यामुळे बारावीनंतरआता पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी शहरातील प्रमुख महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होतआहे.
प्रमुख महाविद्यालयांतील बारावीनंतर प्रथम वर्षाचा विज्ञानआणि वाणिज्य शाखेसाठी कटऑफही ७० ते ८० टक्क्यांच्याही पुढे असतो. बारावीनंतर कॉमर्स शाखेत तब्बल २० ते २५ प्रकारचे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा पर्याय उपलब्ध असून सर्वाधिक नोकरी व व्यवसायाच्या संधी याद्वारे विद्यार्थ्यांना मिळतआहे. तर सायन्समध्येही नवीन विषयांचा अंतर्भाव झाला असून विद्यार्थ्यांना उत्तम करिअरची संधीआहे. कला शाखेचा प्रवासहीआता व्यावसायिकप्रमाणे होऊ लागला असून बारावीनंतर कला शाखेच्या विविध अभ्यासक्रमांद्वारे यशस्वी करिअर करता येऊ शकते.
कॉमर्समध्ये अनेक पर्याय, निवडीची पंचसूत्री महत्त्वाची
बारावीनंतर नक्की कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर उभा राहतो. अनेकदा योग्य माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी गोंधळात असतात. मात्र, करिअरची शाखा निवडताना विद्यार्थ्यांनी सुरुवातीला स्वत:मधील शारीरिक, बौद्धिक व मानसिक क्षमता ओळखायला हवी. त्यानंतर उपलब्ध संधींचा अभ्यास विद्यार्थी व पालकांनी करावा. ध्येय समोर ठेवून त्यासाठी हवे असलेले संवाद कौशल्यही प्राप्त करावे. कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार करून विद्यार्थ्यांनीआपल्या करिअरचा मार्ग निवडल्यास पुढे जाऊन नक्की त्याचा फायदा होतो. कॉमर्स शाखेत बारावीनंतर तब्बल २० ते २२ प्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये करिअरच्या संधीआहेत. बी. कॉम व बी. बी. ए यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारे पदवी प्राप्त करू शकतो. बी. कॉमध्ये १२ स्पेशल विषय तर बीबीएमध्ये ६ स्पेशल विषयआहे. सी.ए.,आयसीडब्ल्यूए, सी.एस., बँकिंग फायनान्स, कन्सल्टंट, विमा, विपणन, जाहिरात, डिजिटल मार्केटिंग, इंपोर्ट, एक्स्पोर्ट यांसह वेगवेगळे असे २० हून अधिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेता येईल. त्यानंतर नोकरी व व्यवसायाच्याही अनेक संधी असतात.
-प्रा. डाॅ. के.आर. शिंपी, माजी प्राचार्य, बीवायके कॉलेज
कला शाखेतहीआता व्यवसायविषयक अभ्यासक्रम
कला शाखेत मर्यादित संधी असल्याने या शाखेकडे विद्यार्थी पाठ फिरवत असतात. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कला शाखेमध्ये अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू झाले असून हे सर्व अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसारखेच स्वरूप देण्यातआलेआहे. क्रेडिट बेस चाॅइस सिस्टिम (सीबीसीएस) मुळे अनेक विद्यार्थीआपल्याआवडीचे विषय घेऊन करिअर करतआहे. बारावीनंतर कला शाखेच्या माध्यमातून बी. ए. त्यानंतर एम.ए. नेट-सेट, बी. एड. एम. एड. अशा पद्धतीने पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त करू शकतात. भाषा विषयानंतर अनुवादक, लेखक तर मानसशास्त्र विषयानंतर समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ तर अर्थशास्त्र विषयातील पदवीनंतरआर्थिक सल्लागार म्हणूनही काम करू शकतो. भूगोल विषयात सर्व्हे, रिमोट सेन्सिंग, ह्यूमन रिसोर्स, इतिहासामध्ये गाईडसह पर्यटन, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, रिसर्च असिस्टंट, सामाजिक शास्त्रांमध्येही अनेक संधीआहेत. बीसीजेद्वारे पत्रकारिता व मास कम्युनिकेशन, ट्रव्हॅल व टूरिझम मॅनेजमेंट, ललित कला, चित्रकला, अभिनय अशा विविध क्षेत्रात संधीआहे. स्पर्धा परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी कला शाखेतून प्रविष्ट होतात.
-प्रा. डाॅ. अनिलकुमार पठारे, उपप्राचार्य, बिटको कॉलेज
सायन्समध्येही अनेक नवीन अभ्यासक्रम
^बारावीनंतर बहुतांश विद्यार्थी व्यावसायिक शाखांमध्ये प्रवेश घेत असतात. पारंपरिक शाखांमधील व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करून देणारी शाखा म्हणून सायन्सकडे बघितले जाते. सायन्समध्येही अनेक नवीन विषयांचा अंतर्भाव झाला असून विद्यार्थ्यांचा कल या नवीन अभ्यासक्रमांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्याकडे वाढलाआहे. सायन्समध्येआयओटी (इंटरनेटऑफ थिंग्स), स्टॅस्टेटि्कस (पायथॉन प्रोग्रॅमिंग), मॅथ्समध्ये मॅथलॅब, पायथॉन प्रोग्रॅमिंग, इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, अॅस्ट्रोनॉमी, रोबोटिक्स, इन्स्ट्रुमेटेंशन या नवीन अभ्यासक्रमांसह बायोटेक्नोलॉजी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, बॉटनी या नियमित अभ्यासक्रमांमध्ये पदवी प्राप्त करता येते. -डॉ. मृणालिनी देशपांडे, उपप्राचार्य, फिजिक्स विभागप्रमुख,आरवायके कॉलेज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.