आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागंगापूरपाठोपाठ दारणा धरणातून २५० कोटींच्या थेट जलवाहिनी योजनेला महासभेने मंजुरी दिली. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या नाशिकरोडच्या दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. केंद्र शासनाच्या ‘अमृत २ अभियानांतर्गत या योजनेसाठी प्रकल्प खर्चाच्या ५२.८१ टक्के निधी अनुदान स्वरूपात मिळणार असून, उर्वरित खर्च महापालिकेला स्वनिधीतून उचलावा लागणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेसाठीही जीवन प्राधिकरणालाच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त केले जाणार आहे.
याबातच्यां प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता सेवाशुल्क, तांत्रिक मान्यता शुल्क अदा करावा लागणार आहे. २५० कोटींच्या योजनेला मंजुरी देताना २.०८ कोटी तांत्रिक मान्यता शुल्क व २.५३ कोटी सल्लागार शुल्क अदा करण्यासही महासभेने मंजुरी दिली आहे. दारणा धरण थेट पाइपलाइन योजनेसाठी पालिकेला केंद्राच्या अमृत २ अभियानांतर्गत प्रकल्प खर्चाच्या एकूण ५२.८१ टक्के रक्कम अनुदान स्वरुपात मिळणार आहे. उर्वरित रक्कम महापालिकेला स्वनिधीतून खर्च करावी लागणार आहे. या योजनेसाठी महापालिकेला स्व-हिस्सा, तांत्रिक मान्यता शुल्क, सल्लागार शुल्कासह सुमारे सव्वाशे कोटींचा भार उचलावा लागणार आहे.
महापालिकेवर १२५ काेटींचा भार
दारणा धरण थेट पाइपलाइन योजनेसाठी पालिकेला केंद्राच्या अमृत २ अभियानांतर्गत प्रकल्प खर्चाच्या एकूण ५२.८१ टक्के रक्कम अनुदान स्वरुपात मिळणार आहे. उर्वरित रक्कम महापालिकेला स्वनिधीतून खर्च करावी लागणार आहे. या योजनेसाठी महापालिकेला स्व-हिस्सा, तांत्रिक मान्यता शुल्क, सल्लागार शुल्कासह सुमारे सव्वाशे कोटींचा भार उचलावा लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.