आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बाप्पाच्या निर्विघ्न दर्शनासाठी २५०० पाेलिस दक्ष; भाविकांसह सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळानाही सुरक्षितता

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरात उत्साह आणि चैतन्यमय वातावरणात गणेशाेत्सव सुरू असून सुमारे ३८० सार्वजिनक गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून त्यांच्याकडून आकर्षक देखावे सादर करण्यात आले आहे. बाप्पांचे दर्शन व आरास, देखावे बघण्यासाठी शहरात हाेणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे २५०० हून अधिक पाेलिस कर्मचारी व गृहरक्षकदलाचे जवान बंदाेबस्तासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

दाेन वर्षांच्या काेराेना महामारीनंतर यंदा प्रथमच गणेशाेत्सव धूमधडाक्यात साजरा हाेत आहे. पाेलिस व मनपा प्रशासनाने गणेश मंडळांना अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांचे ठिकाणी फिक्स पॉइंट बंदोबस्त नेमण्यात आले आहे. पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्र, १०० पुरुष पोलिस अंमलदार व ५० महिला पोलिस अमलदार तसेच ८०० पुरुष २५० महिला गृहरक्षकदलाच्या जवानांसह राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

गणेशमूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था पालिकेने विसर्जनस्थळी केली आहे. याठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक केली आहे. गणेशोत्सव काळात पोलिस प्रशासनाकडून अतिरिक्त बंदाेबस्त ठेवण्वयात आला आहे. पोलिस उपआयुक्तांसह ३ हजार कर्मचारी आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. मौल्यवान गणेश मंडळांना विशेष पाेलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. उत्सव काळात अनुचित प्रकार घडू नये, याकरिता सोशल मीडियावर जनजागृती केली जात आहे. साध्या वेशातील पोलिस वाढवण्यात आला आहे. दरम्यान, भाविकांची गर्दी पाचव्या दिवसानंतर हाेत असल्याने त्यावेळी गस्तही वाढविण्यात येणार आहे. महिलांना साेननसाखळी सांभाळण्याचेही आवाहन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...