आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशप्रक्रिया:शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत इयत्ता अकरावीच्या 25 हजार जागा ; प्रवेशासाठी नोंदणी

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदाही केंद्रीय आॅनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबविली जाणार आहे. नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांतील कनिष्ठ महाविद्यालयांत या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. दहावीचा निकालापूर्वी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा ३० मेपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. प्रवेश अर्जाचा भाग एक व भाग दोन या पद्धतीने प्रवेशाची सर्व प्रक्रिया होईल. नाशिक शहरात ६० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा मिळून सुमारे २५ हजार जागा उपलब्ध आहेत. नाशिकसह राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांत आॅनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होईल. तर ग्रामीण भागात तसेच इतर शहरांमध्ये आॅफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होईल. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्ट्रिस व्हावी यासाठी २३ ते २७ मे दरम्यान ‘मॉक डेमो रजिस्ट्रेशन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवेश अर्ज कसा भरावा, अर्ज भरताना कोणही माहिती आवश्यक आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना या सुविधेमुळे मिळाली. ३० मेपासून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक माहितीसह इतर माहिती भरणे अनिवार्य असेल. अर्ज प्रमाणित करून घेता येणार आहेत. त्याशिवाय आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करता येतील. ऑनलाइन शुल्क भरून फॉर्म लॉक करणे आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडणे, अशा सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत. माध्यमिक शाळा आणि मार्गदर्शक केंद्रांनी विद्यार्थ्यांनी भरलेले प्रवेश अर्ज भाग एकमधील माहिती तपासून प्रमाणित करणे अनिवार्य आहे.

संकेतस्थळाद्वारे अशी होईल प्रवेश प्रक्रिया अकरावीचे प्रवेश हे https://11thadmission.org.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होतील. २०२२-२३ मधील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्याबाबत वेळापत्रक या पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून ठेवावीत. पोर्टल सुरू झाल्यानंतर प्रवेश अर्ज भरण्याचे टप्पे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थी नोंदणी, दुसऱ्या टप्प्यात प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे व तिसऱ्या टप्प्यात प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे असे टप्पे असतील. प्रवेश अर्जाच्या भाग दोनमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये निवडून तो क्रम नोंदविण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...