आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 व्या दिव्यांग राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा:नाशिकच्या रियाची निवड तर प्रशिक्षकपदी शंशाक वझे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

25 व्या नॅशनल डेफ सीनियर स्पोर्ट्स चॅम्पियनशिप ऑर्गनासएड बाय ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ संचलित राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप इंदौर ( मध्यप्रदेश )एमरल हाइट्स इंटरनॅशनल स्कूल येथे 15 ते 19 फेब्रुवारी़ दरम्यान रंगणार आहे. स्पर्धा 16 वर्षांखालील मुले, मुली, 18 वर्षांखालील मुले मुली , पुरुष व महिला खुलागट तर सांघिक, एकेरी आणि डबल्स या प्रकारात खेळविण्यात येणार आहेत.16 वर्षांखालील मुलींच्या गटात नाशिकच्या रिया कुलकर्णी या खेळाडूची निवड झाली आहे.

नाशिकची पहिलीच खेळाडू ती असून महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व करणारी मूक व कर्ण बधिर ( दिव्यांग) टेबल टेनिस खेळाडू असल्याचे तिचे प्रशिक्षक तर सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची जबाबदारी असणारे राष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक शशांक वझे यांनी माहिती दिली.या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष संघात गौरांग कारिया ( मुंबई ) , आकाश आकोलकर ( लातूर ) , दीपक आनंदानी ( अमरावती ) , अप्पा कुंभार ( पुणे ) हे खेळाडू महाराष्ट्राच्या पुरुष गटाचे प्रतिनिधित्व करतील.

रिया कुलकर्णी ही खेळाडू यशवंत व्यायामशाळेच्या टेबल टेनिस हॉल मध्ये नियमित सराव करत असून तिच्या व प्रशिक्षक शशांक वझे यांच्या निवडीबद्दल यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील , महाराष्ट स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ चे मानद सचिव गोपाळ बिरारे , सल्लागार राजेंद्र शिंदे , कशिश छाब्रा , क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे , आनंद खरे ,अविनाश ढोली आदि मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

बातम्या आणखी आहेत...