आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजू महिलांनी साकारला व्यवसाय:मेरा हुनर उपक्रमातून 2.60 लाखांची उलाढाल

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिकमधील होतकरू, युवती महिलांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी कथडा परिसरात ‘मेरा हुनर, मेरी पहचान’ या आनंदमेळा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यातील १५ स्टॉलच्या माध्यमातून २ लाख ६० हजाराची उलाढाल झाली.जुने नाशिक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात या अनाेख्या आनंद मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते.

मेळाव्यात स्टॉलच्या माध्यमातून गरजू महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, हा या मागील उद्देश होता. मेळाव्याचे उद‌्घाटन शेफाली भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आीले. स्त्री श्रेष्ठ आहे. पुरुषांनी तिच्याबद्दलचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. स्त्रियांमध्ये असलेली प्रतिभा, आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या उद्देशाने मेळाव्याचे आयाेजन करण्यात आल्याचे माजी नगरसेविका समिना मेमन यांनी सांगितले.

मेळाव्यात १५ स्टाॅल लावण्यात आले हाेेते. त्याला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रशिक्षण घेत महिलांनी साकारलेल्या वस्तूची या मेळाव्यात विक्री करत त्यांच्या कलेला प्राेत्साहन देण्यात आले. यावेळी आकाश छाजेड, हाजी शोहेब मेमन, निलोफर शेख आदी उपस्थित होते. समिना मेमन यांच्या पुढाकारातून विविध मोफत प्रशिक्षण वर्ग चालविले जाते.

बातम्या आणखी आहेत...