आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त पूर्व परीक्षा २०२२:एमपीएससी परीक्षेला 2628 विद्यार्थ्यांची दांडी; 7  हजार 911  परीक्षार्थींची हजेरी

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ही शनिवारी (दि.०५) पार पडली. या परीक्षेला नाशिक जिल्ह्यातून तब्बल २६२८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. तर ७ हजार ९११ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. एकूण १० हजार ५३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांसाठी नाशिकमध्ये २६ केंद्र होती. तर या केंद्रावर तब्बल ९०० कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

तब्बल २२८ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली आहे.सकाळी ११ वाजता शहरातील विविध २६ केंद्रावर परीक्षा झाली. बहुतांशी सर्वच केंद्रावर परीक्षेसाठी विद्यार्थी निर्धारित वेळेतच हजर झाल्याने यावेळी कुठलाही गोंधळ झाला नाही. दरम्यान या परीक्षेची काठिण्य पातळी मध्यम स्वरूपाची असल्याचे काही परीक्षार्थींनी सांगितले. कारण बहुतांशी प्रश्न हे पाठ्यपुस्तकातील असल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. एकूण २२८ पदांसाठी पेपर झाला. त्यातील उद्योग निरीक्षक सहा पदे, दुय्यम निरीक्षक नऊ पदे आणि कर सहाय्यकांची ११४ पदे तसेच लिपिक टंकलेखनाच्या ८९ पदांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...