आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात कोरोना वाढतोय:एका दिवसात 2,701 नवीन रुग्ण; फक्त मुंबई परिसरात 2,438; रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौथ्या लाटेत एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू न होणे हे राज्यातील चित्र दिलासादायक असले तरी दिवसागणिक वाढणारी रुग्णांची संख्या चिंताजनक ठरते आहे. बुधवारी एका दिवसात राज्यातील सक्रिय रुग्णांमध्ये २,७०१ नवीन रुग्णांची भर पडली असून यात मुंबई शहर व व परिसरातीलच २,४३८ रुग्ण आहेत.

या लाटेत देशातील ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असली तरी महाराष्ट्रात मात्र रुग्ण घरीच बरे होण्याचे व रुग्णालयातील साडेचार टक्के रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण गेल्या आठवडाभर समाधानकारक राहिले आहे. मात्र, याच आठवड्यात दिवसागणिक सक्रिय रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसत आहे. १ जूनच्या दिवशी राज्यात १,०४५ सक्रिय रुग्ण आढळले होते. आठवडाभरात हे प्रमाण ९,८०६ रुग्णांवर पोहोचले असून दैनंदिन रुग्णांची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे. बुधवारी एका दिवसात राज्यात २,७०१ सक्रिय रुग्ण वाढले असून त्यात मुंबईसह परिसरातील जिल्ह्यांचे प्रमाण लक्षणीय म्हणजे २,४३८ आहे.

जास्त बूस्टर घेतलेले राज्य सुरक्षितच
राज्ये- लसीकरण-बाधित
आंध्र प्रदेश - ३९.१२ लाख - ७९
गुजरात- ३३.९१ लाख - ३६३
उत्तर प्रदेश - ३१.०३ लाख - ९१०
पश्चिम बंगाल २८.९६ लाख ४३२
महाराष्ट्र २६.२५ लाख ८,४३२
कर्नाटक २२.५९ लाख २,४७८
हरियाणा २२.५९ लाख ८४१
केरळ १७.५३ लाख ९,८५७
मध्य प्रदेश १४.२३ लाख २३६
ओडिशा १३.५० लाख १४३
(आकडेवारी : ७ जून २०२२, कोविन पोर्टल)

शहरांत संसर्गाचा वाढता टक्का मुंबई महापालिका १,७६५ नवी मुंबई महापालिका २०७ ठाणे महापालिका १४६ पनवेल महापालिका ८४ वसई विरार महापालिका ६० मीरा भाईंदर महापालिका ५७ ठाणे ग्रामीण ३६ कल्याण डोंबिवली महापालिका ३५ (स्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य)

लसीकरणाला पुन्हा गती देण्याची गरज

पहिल्या व दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला काेराेनामुळे माेठे नुकसान सहन करावे लागले. मात्र लसीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळे तिसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण कमी हाेते. मात्र रुग्ण कमी झाल्याने लसीकरणाचे प्रमाण घटले. ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

रुग्णसंख्येत राज्याचा पहिला क्रमांक नको

आकारमान, शहरीकरण व लोकसंख्येची घनता यात अव्वल राहिलेले महाराष्ट्र राज्य आतापर्यंतच्या कोरोनाच्या एकूण केसेस (७८,९६,११४) आणि एकूण मृत्यू (१,४७,८६६) यात देशात पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. सध्या सुरू झालेल्या चौथ्या लाटेत राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असली तरी याबाबत केरळ हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. केरळमधील सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या १०,४०० आहे तर महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्या ९,८०६ आहे. (स्रोत - mygov.in/covid19)

बातम्या आणखी आहेत...