आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:पहिल्या दिवशी 275 बालकांनी घेतली गोवर; रुबेलाची लस

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकने २८ दिवसांसाठी गुरुवारी (दि. १५) सुरू केलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत पहिल्या दिवशी २७५ बालकांचे लसीकरण करण्यात आले. गोवर रूबेला लसीकरण मोहिमेसाठी बारा ठिकाणी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. या माता बाल संगोपन अधिकारी डॉ अजिता साळुंखे यांच्या पथकाने पंचवटी विभागातील औरंगाबाद नाका परिसरात स्थलांतरित नागरिकांच्या बालकांना डोस दिले.

पहिल्या दिवशी आरोग्य सेविकांच्या माध्यमातून १३६ बालकांना एम आर १ तर १३९ बालकांना एम आर २ चा डोस देण्यात आला. नऊ महिने ते पाच वर्षे वयाच्या बालकांना गोवर रूबेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांची यादी तयार करण्यात आली आहे. लसीकरणाच्या डोस मधील अंतर २८ दिवसांचे राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...