आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाल परीचा विक्रम!:11 दिवसांत 275 कोटींचे उत्पन्न; दिवाळीनिमित्त जादा गाड्यांमधून 4 कोटी नागरिकांचा प्रवास

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या काळात हंगामी दरवाढ केल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांनी लालपरीवर मोठा विश्वास दाखवला. सदरील 21 ते 31 ऑक्टोबर 2022 या काळात दिवाळीसाठी सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांमधून सुमारे 4 कोटी 95 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

शेखर चन्ने यांची माहिती

या अकरा दिवसांत एसटीला सुमारे 275 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले असून संपूर्ण महिनाभरात एसटी महामंडळाने 642 कोटी रूपयांच्या महसूलाचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी एसटीने 56 लाख किमीचा प्रवास करीत एकाच दिवशी 31 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यात जोडून आलेल्या सुट्ट्या आणि दिवाळीचा सण पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात नियमित बसफेऱ्यांबरोबरच 'दिवाळी स्पेशल' जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीच्या काळात दरवर्षी प्रवासी दरात 10 टक्के हंगामी दरवाढ केली जाते. या दरवाढीनंतरही प्रवाशांनी आपल्या लालपरीवर म्हणजेच एसटीवर विश्वास दाखवत प्रवास केला. या नागरिकांनी एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा गाड्यांचा लाभ घेत आपल्या इच्छितस्थळी प्रवास केला. 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान सोडलेल्या जादा गाड्यांद्वारे 4 कोटी 95 लाख प्रवाशांनी केलेल्या प्रवासाच्या माध्यमातून 275 कोटींचा महसूल मिळाला आहे.

ज्येष्ठ नागरिकांनीही घेतला लाभ

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरीकांसाठी 'अमृत ज्येष्ठ नागरीक' ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत 75 वर्षांवरील नागरीकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास करता येतो. 21 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान या योजनेतंर्गत 75 वर्षांवरील 26 लाख 55 हजार 138 नागरीकांनी प्रवास करत सेवेचा लाभ घेतला आहे. तर संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात 80 लाख 38 हजार 91 ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे

बातम्या आणखी आहेत...