आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • 28000 Applications For Scholarships In The State And 1544 Applications Pending In Nashik; Action Against Colleges If Students Are Deprived Of Scholarship| Marathi News

अनास्था:शिष्यवृत्तीचे राज्यात 28000 तर नाशिकमध्ये 1544 अर्ज प्रलंबित; शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास महाविद्यालयांवर कारवाई

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंंतर्गत सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टलवर राज्यात २८ हजार ४४७ विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही विद्यार्थी आणि महाविद्यालयांकडे प्रलंबित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील १५४४ अर्जांच्या त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयांना वारंवार सूचना देऊन देखील महाविद्यालय यासंबंधी कार्यवाही करत नसल्याने, आता समाजकल्याण विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी सादर न केल्यास थेट महाविद्यालयांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली आहे.

विभागातील नाशिक जिल्ह्यात १९ हजार १३९ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहे. आजच्या स्थितीत यातील ९१३ अर्ज हे विद्यार्थ्यांकडेच तर ६३१ अर्ज महाविद्यालयांच्या स्तरावर प्रलंबित आहेत. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील १० हजार २७४ अर्ज हे महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे वर्ग केलेले नाहीत. हे अर्ज प्रलंबित राहिल्यास गरजू विद्यार्थ्यांना आपल्या हक्काच्या शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे. त्यामुळे आता समाजकल्याण विभागानेच यात लक्ष घातले असून, याबाबत महाविद्यायांनाच कडक सूचनावजा दमच दिला आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांनीच सादर करणे आवश्यक आहे.

आॅनलाइनची व्यवस्था असली तरीही विद्यार्थ्यांकडून पाठपुरावा करून महाविद्यालयांनीच हे अर्ज सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांना सक्त सूचना देणे आवश्यक आहे. पण, महाविद्यालयांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता विद्यार्थी किंवा महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित असले, किंवा त्यांच्या स्तरावरूनच ते समाजकल्याणकडे सादर झाले नसले तरीही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांचीच असेल असेही नमूद केले आहे. शिवाय महाविद्यालयांनी त्वरित अर्ज सादर करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, यासाठी समाजकल्याण विभागाकडून पाठपुरावा केला जात असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

आवाहनानंतरही दुर्लक्षच
शिष्यवृत्तीचे प्रलंबित असलेले अर्ज समाजकल्याण विभागाकडे सादर करण्यासंदर्भात समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांच्याकडून वारंवार आवाहन करूनही महाविद्यालयांकडून प्रतिसाद मिळत नाही. आता महाविद्यालयांवरच कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचा इशाराही आयुक्तालयाकडून देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...