आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश मंडळांची तारांबळ:अवघ्या पाऊण तासात २९ मिमी पाऊस; शहरभर पाणीच पाणी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवडाभरापासून उघडीप दिलेल्या पावसाने मंगळवारी (दि. ३०) दुपारी अचानक धुवाधार हजेरी लावल्याने नाशिककरांची तारांबळ उडाली. शहर व परिसरातील गणेशमूर्ती विक्रेत्यांसह देखाव्यासाठीचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची धावपळ झाली. अवघ्या ४० मिनिटात शहरात तब्बल २९ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे.

नाशिक शहर व परिसरात आठवड्यापासून पावसाची विश्रांती हाेती. मात्र, गेल्या दाेन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण हाेते. मंगळवारी (दि. ३०) सकाळपासूनच उकाडा वाढला हाेता. दुपारनंतर अचानक ढग दाटून येऊन कडकडाटासह पावसाला जाेरदार सुरुवात झाली. या पावसामुळे शहरातील गणेशमूर्ती विक्रेत्यांचे डाेंगरे वसतिगृह मैदानासमाेरील गाळे विक्री ठिकाणी, शालिमार, त्र्यंबकनाका, गंगाापूरराेड, सिडकाेतील त्रिमुर्ती चाैक, लेखानगर, गाेविंदनगर भागातील व्यावसायिकांची पळापळ हाेऊन धांदल उडाली. त्यातच या ठिकाणी गणेशमूर्ती व सजावट, आराससाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहक व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही त्रेधातिरपीट उडाली. तर अनेक देखाव्यांचेही यामुळे नुकसान झाले आहे.

डाेंगरे वसतिगृह मैदानावर तळे; मूर्तीविक्रेत्यांचे हाल
पावसाचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने गणेशमूर्तींची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची धावाधाव झाली होती. मात्र, पाऊस उघडल्यानंतर गणेशमूर्ती खरेदीला पुन्हा नागरिकांनी गर्दी केली. डाेंगरे वसतिगृह मैदानावर अखिल भारतीय महानुभाव संमेलनस्थळी पावसाने वाहनतळावर व सभेच्या प्रवेशद्वारावर पाणी साचून तळे निर्माण झाले हाेते.

काॅलेजराेड, गंगापूराेडला ठिकठिकाणी साचले डबके
मुसळधार पावसाने काॅलेजराेड, समर्थनगर, भाेंसला महाविद्यालय प्रवेशद्वार, महात्मानगर, जेहान सर्कल येथे पावसाळी गटारीच्या चेंबरजवळ पाणी साचून डबके तयार झाले हाेते. तर बहुतांश ठिकाणी जणू एखाद्या नाल्यातून पाणी प्रवाहाने वाहत असल्याचे चित्र हेते. ठिकठिकाणी वाहतूक काेंडी निर्माण हाेऊन वाहनांच्या रांगा लागल्या हेात्या.

सिडकाे-सातपूरमध्ये घरांत शिरले पाणी; वस्तूंचे नुकसान
सिडकाेतील उंटवाडी भागात, शिवशक्ती चाैक, आयटीआय पुलानजीक, सरस्वती चाैक, उत्तमनगर, पवननगर, माेरवाडी या भागात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. याच परिसरांमध्ये पाण्याचा निचरा हाेण्यासाठी जागा नसल्याने गुघड्यापर्यंत पाणी हाेते. तर सातपूर मधील श्रमिकनगर, अशाेकनगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी घुसून घरातील संसाराेपयाेगी साहित्याचे नुकसान झाले. गणेश मंडळांचेही पावसाने माेठे नुकसान केले.

बातम्या आणखी आहेत...